५ वर्षाच्या मुलाचे अपहरण झाल्याची बातमी मिळतातच अवघ्या ३ तासांच्या आत पोलीसांनी धरले अपहरण कर्त्याला





बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये २ फेब्रुवारी अप्पर बिबवेवाडी येथुन ज्योती धनराज साळुंखे,पवननगर, चाळ नं. ६, शनिमंदिरा जवळ, बिबवेवाडी यांचा मुलगा ५ वर्षे हा चाळीमध्ये रस्त्यावरती मुलांसमवेत खेळत असताना त्यास आरोपी स्वप्नील रमेश शिंदे याने जिवे ठार मारण्याचे उद्देशाने त्याचेकडील दुचाकीवरून पळवून घेवुन गेल्याची माहिती ज्योती साळुंखे यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात येथे तक्रार दिली.

मुलगा अपहरण झाल्याची माहिती प्राप्त होताच लागलीच बिबवेवाडी पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक झावरे, पोलीस निरीक्षक गुन्हे अनिता हिवरकर तसेच तपास पथकाचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण काळुखे यांनी घटनास्थळी भेट देवुन गुन्हयाबाबत प्राथमीक माहिती काढुन अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग नामदेव चव्हाण, पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र गलांडे यांचे मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला.

आरोपी स्वप्नील रमेश शिंदे याचे कुटूबिंय मित्र यांचेकडे कसुन चौकशी करुन, सदर भागातील सी.सी.टी.व्ही. तसेच तांत्रिक विश्लेषनाच्या आधारे बिबवेवाडी, मार्केटयार्ड व स्वारगेट परिसरामध्ये पोलीसांच्या चार स्वतंत्र टिम तयार करुन पुर्ण भाग पिंजुन काढण्यात आला,

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या