सन 2022-23 ची वार्षिक सर्वसाधारण सभेची सभासदांना नोटीस आमंत्रण करणेबाबत निवेदनात मागणी.
प्रतिनिधी सचिन रणदिवे
मो नं 9730093611
आर्थिक वर्ष 2022 23 ची वार्षिक सर्वसाधारण सभा शासनाचे नियमाप्रमाणे सप्टेंबर 2023 मध्ये घेणे बंधनकारक आहे त्यामुळे पुढील सप्टेंबर 2023 महिन्याचे वार्षिक सभेसाठी सर्व सभासदांना विकास सोसायटीच्या सदस्यांना व ग्रामपंचायत सदस्यांना 14 दिवस अगोदर नोटीस देणे आवश्यक आहे व सदरची नोटीस रजिस्टर पोस्टाने सर्वांना पाठवण्यात यावी पाच वर्तमानपत्रात या वार्षिक सभेची तारीख वेळ व ठिकाण नमूद करून जाहिरात प्रसिद्ध करण्यात यावे अशा आशयाचे निवेदन श्री भानुदास सालगुडे-पाटील पुरंदावडे विकास सोसायटी पुरंदावडे यांनी मा श्री काकडे साहेब सचिव कृषी उत्पन्न बाजार समिती अकलूज यांना दिले आहे. यामुळे सर्व ग्रामपंचायत सदस्य विकास सोसायटीच्या सदस्यांना आपले या माध्यमातून चर्चा करण्यात येईल यामुळे माळशिरस तालुक्यामध्ये अतिशय चांगलं वातावरण देखील होईल व मार्केट कमिटी ला पुढील दिवस चांगले येतील अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. यावेळी भानुदास सालगुडे-पाटील,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अजित बोरकर सोमनाथ पिसे समाधान काळे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.सदर निवेदनाच्या माहितीसाठी व योग्य त्या जलद कारवाईसाठी श्री शिंदे साहेब असिस्टंट रजिस्टर अकलूज, श्री मदनसिंह मोहिते-पाटील सभापती अकलूज कृषी उत्पन्न बाजार समिती, श्री उत्तमराव शिवदास जानकर संचालक अकलूज कृषी उत्पन्न बाजार समिती यांना दिल्या आहेत.
0 टिप्पण्या