दुष्काळग्रस्त गाव पाणी हक्क समितीला चिंचोली मोराची गावचा पाठींबा

दुष्काळग्रस्त गाव पाणी हक्क समितीला चिंचोली मोराची गावचा पाठींबा

शिरूर तालुक्यातील दुष्काळी गावांना शेतीसाठी पाणी मिळावे यासाठी दुष्काळग्रस्त गाव पाणी हक्क समितीची स्थापना करण्यात आली. या समितीला पाठींबा देण्यासाठी व शेती पाण्याच्या मागणीसाठी चिंचोली मोराची येथे विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले.या वेळी उपस्थित ग्रामस्थांनी एकमुखाने पाणीहक्क संघर्ष समितीच्या आंदोलनाला पाठींबा देत याबाबतचा ग्रामसभा ठराव पास केला.
     वर्षानुवर्षे दुष्काळी असणारे चिंचोली मोराची आणि जवळपासचे गावाला कोणत्याही परिस्थितीत शाश्वत पाणी उपलब्ध झाले पाहिजे यावर एकमत व्यक्त करत शासनाने पाणी डिंभे कालवा अथवा चासकमान कालवा किंवा ज्या पद्धतीने या परिसराला पाणी उपलब्ध होईल त्या माध्यमातून पाणी द्यावे. अनेक पिढीने दुष्काळाच्या झळा सोसल्या,निवडणुकांमध्ये पाण्याबाबत आतापर्यंत केवळ आश्वासने देऊन दिशाभुल करण्यात आली आहे.चिंचोली मोराची व परिसरातील गावे ही शेतीसाठी केवळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहेत.येथील नागरिकांच्या भावना पाणीप्रश्नावर अतिशय तीव्र असून शासनाने कोणत्याही परिस्थितीत या प्रश्नावर तोडगा काढला पाहिजे यासाठी दुष्काळग्रस्त पाणी हक्क संघर्ष समिती आंदोलन उभे करणार आहे.त्यामध्ये सर्व ग्रामस्थ जास्त संख्येने सहभागी होणार असून मागणी पूर्ण करण्यासाठी उग्र आंदोलन करण्याचा निर्णय या विशेष ग्रामसभेत घेण्यात आला.यावेळी सरपंच सौ.विमलताई अर्जुन नाणेकर,ग्रामसेवक संतोष गिरी,पोलीस पाटील अमित उकिर्डे ,सौ.चैत्रालीताई गोरडे,सौ. शितलताई नाणेकर,राहुल नाणेकर,निवृत्ती नाणेकर,जयसिंग नाणेकर,बाजीराव उकिर्डे ,मच्छिंद्र उकिर्डे ,दत्ता उकिर्डे ,दादासाहेब उकिर्डे ( सामाजिक कार्यकर्ता) ,गणेश दादा धुमाळ(खंडोबा देवस्थान ट्रस्ट उपाध्यक्ष),नामदेव नाणेकर,सुरेश नाणेकर ,सूर्याजी नाणेकर ,संकेत नाणेकर ,बाळासाहेब थोपटे,भरत थोपटे व इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या