बारामती तालुक्यातील अवैध धंद्यांचा सुळसुळाट लवकरच पुराव्यासहित पोलखोल करणार माहिती अधिकार कार्यकर्ता दया दामोदरे यांचा इशारा.....!

बारामती तालुक्यातील अवैध धंद्यांचा सुळसुळाट  लवकरच पुराव्यासहित पोलखोल करणार माहिती अधिकार कार्यकर्ता दया दामोदरे यांचा इशारा

बारामती तालुक्यात हातभट्टी दारू, मटका-जुगार, गुटखा विक्री, ताडी, वेश्याव्यवसाय, मुरुम-वाळू तस्करी, चोरीचं सोनं खरेदी-विक्री, चोरीच्या गाड्यांचा स्क्रॅप व्यवसाय, लॉजमधील अवैध कृत्ये, चोरीचं भंगार, ओव्हरलोड वाहतूक आणि जुन्या गाड्यांची बेकायदेशीर खरेदी-विक्री अशा सर्व प्रकारचे अवैध धंदे खुलेआम सुरू कोणाच्या अर्शिर्वादाने चालु आहेत, लवकरच पुराव्या सहित पोलखोल करणार असल्याची माहिती .

या सर्व गैरप्रकारांना स्थानिक प्रशासन व काही प्रभावशाली मंडळींच्या आशीर्वादामुळे चालना मिळत असल्याचा गंभीर आरोप माहिती अधिकार कार्यकर्ता दया दामोदरे यांनी केला आहे.

ते म्हणाले की, “जनतेसमोर लवकरच ठोस पुरावे सादर करून या अवैध साम्राज्याची पोलखोल करण्यात येईल. प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे आणि कायद्याच्या अंमलबजावणीत झालेल्या त्रुटींमुळे बारामती तालुक्यात अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाला आहे.”

जनतेमध्ये या घोषणेने मोठी उत्सुकता निर्माण झाली असून, प्रशासन यानंतर कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या