दिनांक : २३/११/२०२५
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अंतर्गत निरीक्षणासाठी येणारे देशी दारू दुकाने यांनी एमआरपीच्या किंमतीमध्ये विक्री करणे आवश्यक असते. विक्री जर एमआरपीच्या वर केली तर त्या परवानाधारकावर कारवाई करणे आवश्यक असते. हे परवानाधारक ज्या ज्या वेळेस एमआरपीच्या वर विक्री करताना आढळून येतात त्या त्या प्रसंगी त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे आणि एमआरपीच्या वर विक्री करून नियम भंग बाह्य कार्य केल्यास त्यांच्यावर दंडाची कारवाई करण्याचा नियम आहे. जर परवानाधारक सातत्याने सूचना आणि नियमांचे उल्लंघन करीत असेल अशा वेळी परवाना कायमस्वरूपी बंद करण्यासाठी प्रस्ताव करणे आवश्यक असतो.
पिंपरी चिंचवड आणि पुणे शहर या विभागात कार्यरत असणाऱ्या देशी दारू दुकानांची विक्री ही राजरोसपणे एमआरपीच्या वर केली जात आहे. या संबंधित राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकाऱ्यांना याची कल्पना दिली असता त्यांच्यावर कारवाई करण्यास असमर्थता दर्शविण्यात येते. या मागचे कारण शोधले असता देशीदारू परवानाधारक हे एमआरपीच्या वर विक्री करण्यासाठी पिंपरी चिंचवड आणि पुणे शहर विभागातील अधिकारी मासिक स्वरूपात मोठ्या प्रमाणावर हप्ते घेताना आढळून येत आहेत. एखादी तक्रार आली असता त्यांच्यावर कारवाई दाखविण्यासाठी एखादी कारवाई केली जाते परंतु एमआरपीमध्ये विक्री करण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले जात नाहीत कारण त्या ठिकाणी आपला आर्थिक फायदा आणि येणारा हप्ता बंद होईल म्हणून आजत्यागत पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड विभागातील देशी दारू विक्री करणारे दुकाने राजरोसपणे नागरिकांची लूट करत आहे. याला सर्वस्वी जबाबदार हे राज्य उत्पादन शुल्क खात्याचे त्या विभागात कार्यरत असणारे निरीक्षक आणि दुय्यम निरीक्षक आहेत. हे सर्व अधिकारी निरीक्षक आणि दुय्यम निरीक्षक एवढ्या मोठ्या प्रमाणावर त्यांची मागणी ही मुंबईत बसणाऱ्या मोठ्या अधिकाऱ्याच्या बळावर करत असल्याचे माहिती मिळत आहे. यांना जर हप्ते घेण्यास अडथळा निर्माण झाल्यास मुंबईत बसणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून सपोर्ट केला जातो. त्यामुळे स्थानिक जिल्हा पातळीवर कार्य करणाऱ्या अधीक्षकांना कार्य करणे जड जात असल्याचे दिसत आहे. लवकरच या माध्यमातून माहिती सेवा भावी टाइम्स जनतेसमोर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सर्व असंवैधानिक कृती प्रकट करणार आहे. यामध्ये क्लर्क स्टाफ ते पिंपरी चिंचवड पुणे शहर येथे काम करणारे दुय्यम निरीक्षक यांच्यापर्यंत होणाऱ्या भ्रष्टाचाराचा सर्व पुराव्यानिशी उघड करणार आहे.
यापुढे नागरिकांची अशी लूट थांबविली नाही तर नागरिक माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्याकडे तक्रार करून आंदोलन केले जाईल अशी आमच्या माध्यमाशी बोलताना एडवोकेट सागर यांनी सांगितले.

0 टिप्पण्या