रस्त्यांसाठी जमीन गेली ,तर मोबदला कमी मिळणार ....!!

 

 राज्यातील महामार्गांसाठी शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहित झाल्यास त्यासाठी मिळणारा मोबदला घटवण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने शुक्रवार दिनांक १४ जानेवारी रोजी यासंदर्भात अधिकृत जीआर जाहीर केला आहे .राज्य सरकारने महामार्गासाठी जमीन अधिग्रहित झाल्यास मोबदला देण्याच्या गुणक मध्ये बदल केला आहे . त्यामुळे आता जमीन धारकाचा मोबदला अर्धाच होईल .



राज्याच्या महसूल विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार, आता भूखंड धारकांना राज्य किंवा राष्ट्रीय महामार्गांसाठी कृषी जमिनीचे अधिग्रहण झाल्यास २०टक्के आणि अकृषक जमिनीचे अधिग्रहण झाल्यास ६० टक्के कमी मोबदला मिळेल .तसेच आता सर्व प्रकारच्या भूखंडाचा मोबदला निश्चित करताना रेडीरेकनरचे दरसुद्धा २०टक्के कमी करण्यात आलेले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या