प्राथमिक आरोग्य केंद्र माणकीचे वैद्यकीय अधिकारी यांचा मनमानी कारभार........
जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या आदेशाला दाखवली केराची टोपली?
मौजे माणकी प्राथमिक आरोग्य केंद्र माणकी या केंद्रातील वैद्यकीय अधिकारी यांचा मनमानी कारभार सुरू असून मा. जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवल्याची निदर्शनास आले आहे मा. जिल्हा आरोग्य अधिकारी जावक क्रमांक-जिपसो/आरोग्य/NHM/Eeo/2022 आरोग्य विभाग जिल्हा परिषद सोलापूर दिनांक 25/08/2022 च्या राष्ट्रीय आरोग्य अभियान मधील आरोग्य सेविका ए.एन.एम यांची 2022-23 पुनर्नियुक्ती बाबत जो आदेश पारित करण्यात आला होता त्या अनुषंगाने वैद्यकीय अधिकारी यांनी आरोग्य सेविका यांना त्या पत्राच्या अनुषंगाने माणकी या प्राथमिक आरोग्य केंद्रातून रिलिव्ह न करता प्राथमिक आरोग्य केंद्र माणकी या ठिकाणी काम करण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे. तरी या सर्व प्रकरणाची संपूर्ण खातेनिहाय दप्तर चौकशी करण्यात यावी व माणकी वैद्यकीय अधिकारी व आरोग्य सेविका यांचे तात्काळ निलंबन करण्यात यावे कारण यांनी शासनाची व आरोग्य विभागाची फसवणूक केली आहे तसेच फसवणूक केल्याप्रकरणी 420 चा गुन्हा दाखल करण्यात यावा अशा आशयाचे निवेदन माननीय तालुका आरोग्य अधिकारी मोहिते साहेब यांना दिले आहे या निवेदनाच्या अनुषंगाने तात्काळ योग्य ती कायदेशीर कारवाई न झाल्यास अन्यथा दिनांक-18-10-2022 रोजी दलित महासंघाच्या वतीने पंचायत समिती माळशिरस येथे तालुका आरोग्य अधिकारी यांच्या कार्यालयासमोर तीव्र स्वरूपात हालगीनाद आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी यामध्ये काही अवचित प्रकार घडल्यास याला सर्वस्वी जबाबदार तालुका आरोग्य अधिकारी व प्राथमिक आरोग्य केंद्र माणकी हे राहतील. सदर निवेदनाची माहितीसाठी प्रत मा. तानाजीराव सावंत साहेब आरोग्य मंत्री महाराष्ट्र राज्य,मा. तुकाराम मुंडे साहेब आरोग्य सेवा आयुक्त,मा. जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांना ई-मेल द्वारे पाठवण्यात आल्या आहेत.
0 टिप्पण्या