दौंड तालुक्यातील स्वस्त रेशनिंग दुकानदार धान्य दिल्यानंतर पावती न दिल्यास बेमुदत आमरण उपोषण......संदीप लगड

दौंड तालुक्यातील स्वस्त रेशनिंग दुकानदार धान्य दिल्यानंतर पावती न दिल्यास बेमुदत आमरण उपोषण...... संदीप भाऊ लगड

प्रतिनिधी-दौंड
दौंड तालुक्यातील स्वस्त रेशनिंग दुकानदार धान्य दिल्यानंतर शासनाच्या नियमानुसार पावती देणे बंधनकारक आसतानाही पावती का देत नाही.ग्राहक स्वस्त धान्य घेवून गेल्यानंतर आपल्याला धान्य किती मिळाले ती पावती चेक करण्यासाठी व RC नंबर जो आपण रेशन घेताना बायोमेट्रिक साठी येतो तो नंबर टाकून आपण आपली पावती प्राप्त करू शकतो.https://mahaepos.gov.in/src-Trans-Int.jsp पावती चेक केल्यानंतर ग्राहकांची फसवणूक मोठ्या प्रमाणात होत आहे. स्वस्त रेशन दुकानदारांचा FPS ID चेक करण्यासाठी खालील लिंक व पहावे किंवा आपल्या पावतीवर देखील आयडी आसतो.http://mahaepos.gov.in/FPS-trans-Abstract jsp या आयडीवर चेक केल्यानंतर ग्राहकांना पावती प्रमाणे(माल)धान्य मिळत नाही.त्याप्रमाणे स्वस्त रेशनिंग दुकानदाराने शासनाकडून ग्राहकानसाठी किती रेशनिंग घेतले आहे ते जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर चेक केल्यानंतर पुर्ण माहिती मिळते.https://mahaepos.gov.in/FPS-status.jsp याच्यावर पाहू शकतो.त्याप्रमाणे स्वस्त रेशन दुकानादारा विरूध्द तक्रार देण्यासाठी खालील लिंकवर पहावे https://mahafood.gov.in/pggrams या लिंकवर पाहू शकतो.त्यासाठी दौंड तालुक्यातील स्वस्त रेशनिंग दुकानदार फलक लावण्यात यावे.त्यानंतर स्वस्त रेशनिंग दुकानदारांनी पावती देणे बंधनकारक आसतानाही स्वत रेशनिंग दुकानदार शासनाच्या नियमाचे उल्लंघन केले जात आहे.जो स्वस्त रेशनिंग दुकानदार धान्य देवून पावती देत नसतील त्या स्वस्त रेशनिंग दुकानदाराचा परवाना त्वरीत रद्द करण्यात यावा.अशी मागणी माहिती सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य व त्रिदल सैनिक सेवा संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.मागणी मान्य न झाल्यास वार सोमवार दिनांक १९/०३/२०२४ रोजी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करण्यात येणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या