पुणे जिल्हयातील दौंड तालुक्यात पाटबंधारे प्रकल्पांच्या लाभ क्षेत्रातील स्लॅबपात्र खातेदारांच्या जमिनींच्या ७/१२ उताऱ्यावरील इतर अधिकारातील पुनर्वसनाचे राखीव शेरे कमी करण्यासाठी महसूलमंत्री यांना निवेदन-संदीपभाऊ लगड

पुणे जिल्हयातील दौंड तालुक्यात पाटबंधारे प्रकल्पांच्या लाभ क्षेत्रातील स्लॅबपात्र खातेदारांच्या जमिनींच्या ७/१२ उताऱ्यावरील इतर अधिकारातील पुनर्वसनाचे राखीव शेरे कमी करण्यासाठी महसूलमंत्री यांना निवेदन-संदीपभाऊ लगड

प्रतिनिधी/दौंड

दौंड तालुक्यातील पाटबंधारे प्रकल्पांच्या लाभक्षेत्रात स्लॅबपात्र खातेदारांच्या जमिनींच्या ७/१२ उताऱ्यावरील इतर अधिकारातील पुनर्वसनाचे राखीव शेरे कमी करावे.त्या पध्दतीने पुणे जिल्हयातील अनेक तालुक्यातील इतर अधिकारातील पुनर्वसनाचे राखीव शेरे कमी करण्यासाठी शासन निर्णय महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग (म.व.पु) शासन परिपत्रक क्रमांक :- आरपीए/३४२३/प्र.क्र.२२४/र-४ मादाम कामा मार्ग हुतात्मा राजगुरू चौक,मंत्रालय,मुंबई ४०० ०३२ दिनांक:- १५/०२/२०२४ (०१). महसूल व वन विभाग शासन निर्णय क्र.आर पी ए/२०२२/प्र.क्र.०९र.१,दिनांक१८/०१/२०२३, (०२). विभागीय आयुक्त पुणे यांचे पत्र क्र.पुनर्व/अ.का./आर आर/कावि/२०८१/२०२३,दिनांक १८/०९/२०२३,राज्यातील पाटबंधारे प्रकल्पांच्या लाभक्षेत्रातील स्लॅबपात्र खातेदारांच्या जमिनींच्या ७/१२ उताऱ्यातील इतर हक्कातील पुनर्वसनाचा राखीव असलेले शेरे उठविण्याबाबत महसूल व वन विभाग,शासन निर्णय दिनांक १८/०१/२०२२ अन्वये कार्यपध्दती केलेली आहे.त्याच पध्दतीने दौंड तालुक्यातील इतर हक्कासाठी पुनर्वसनाचे राखीव शेरे उठवावेत.सदर शासन निर्णयानुसार पुणे जिल्हयातील पाटबंधारे प्रकल्पांच्या लाभक्षेत्रामधील गटांवरील ज्या स्लॅबपात्र खातेदारांच्या/भुधारकांच्या जमिनींना सिंचनाच्या सुविधा उपलब्ध नाहीत,सिंचनाच्या सुविधा उपलब्ध होणार आहेत,सदर जमिनींचा संपादन निवाडा किंवा संपादन अद्यापर्यंत करण्यात आलेली नाही.अशा प्रकरणी विभागीय आयुक्त,पुणे यांनी विहित समितीच्या मान्यतेने दिनांक ०१/०९/२०२३ रोजी सादर केलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने '' पुनर्वसनासाठी राखीव '' असे ७/१२ उताऱ्याच्या इतर हक्कात नोंदविलेले शेरे कमी करणेची बाब शासनाच्या विचारधीन होती.त्याच पध्दतीने दौंड तालुक्यातील इतर हक्कातील पुनर्वसनाच्या राखीव असलेले शेरे उठविण्याबाबत शासनाने त्वरीत निर्णय घ्यावा.पुणे जिल्हयातील पाटबंधारे प्रकल्पांच्या लाभक्षेत्रातील खालील तक्त्यामध्ये नमुद गावांमधील गटांच्या जमिनींच्या हस्तांतरण व्यवहारावर पुनर्वसन अधिनियमानुसार निर्बंध लादण्यासाठी ७/१२ उताऱ्यावरील इतर हक्कातील पुनर्वसनासाठी राखीव असे नमूद केलेले शेरे कमी करण्यास खालील अटी व शर्तीच्या अधिन राहून शासन मान्यता देण्यात येत आहे.हे सर्व नियम,अटी व शर्ती दौंड तालुक्यातील पुनर्वसनाचा शेरा कमी करण्याचा निर्णय शासनाने घ्यावा.दौंड तालुक्यातील सामान्य व गोरगरीब जनतेवर अन्याय व अत्याचार झाला आहे.दौंड तालुक्यातील सामान्य व गोरगरीब जनता आज भूमिहीन झाली आहेत.शासनाने पुणे जिल्हयातील सर्व तालुक्यातील सर्व पाटबंधारे प्रकल्पांच्या लाभक्षेत्रातील स्लॅबपात्र खातेदारांच्या जमिनीच्या ७/१२ उताऱ्यावरील इतर अधिकारातील पुनर्वसनाचे राखीव शेरे कमी करण्याचा निर्णय घ्यायाला पाहिजे होता.परंतू शासन व प्रशासनाने दौंड तालुक्यातील सर्व पाटबंधारे प्रकल्पांच्या लाभक्षेत्रातील स्लॅबपात्र खातेदारांच्यावर अन्याय झाला आहे.दौंड तालुक्यातील इतर अधिकारातील पुनर्वसनाचे शेरे कमी न केल्यामुळे वार सोमवार दिनांक १९/०३/२०२४ रोजी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर माहिती सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य,त्रिदल सैनिक सेवा संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या माध्यमातून बेमुदत आमरण उपोषण करण्यात येणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या