दौंड तालुक्यात पुनर्वसनाच्या जमिनीमध्ये पन्नास टक्के बोगस जमिन वाटत झाल्याचे समोर आले आहे-संदीप भाऊ लगड
प्रतिनिधी -दौंड
दौंड तालुक्यातील पुनर्वसनाची पन्नास टक्के जमिन बोगस वाटप झाल्याचे समोर आले आहे.पुनर्वसनाचे ज्या धरणग्रस्त खातेदारांना जे वाटप झाले आहे ते योग्य आहे.आता खातेदारांची मुले व नातू यांना जे चार ते पाच जाग्यावर बोगस वाटप झाल्याचे सन २०१६ रोजी माहिती सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य,त्रिदल सैनिक सेवा संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप लगड यांनी ४७ उपोषण चार जनआंदोलन आजपर्यंत करण्यात आली आहेत.४८ वे बेमुदत आमरण उपोषण वार सोमवार दिनांक १९/०३/२०२४ रोजी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होणार आहे.दौंड तालुक्यातील सामान्य व गोरगरीब जनतेकडे पुनर्वसनाची काही कागदपत्रे असतील तर आपण संदीप लगड यांच्याशी संपर्क साधून कागदपत्रांची एक झेरॉक्स द्यावी.ज्या लोकांना बोगस वाटप केले आहे ते ही समोर आले आहे.पुनर्वसनाचे पन्नास टक्के बोगस वाटप झाले आहे.ते बोगस वाटप झालेले क्षेत्र आता माघारी होण्याचे काम लास्ट टप्प्यात आले आहे.दौंड तालुक्यातील ज्या लोकांचे क्षेत्र पुनर्वसनला जावून वाटप झाले आहे.त्या गावात जावून ज्या लोकांचे क्षेत्र पुनर्वसनला संपादित केले आहे.त्या लोकांनी एकत्र येण्याची गरज आहे.पुर्ण दौंड तालुक्यात जनजागृती मोहिम उभा करण्यात येणार आहे.आता दौंड तालुक्यातील सर्व सामान्य व गोरगरीब जनतेने आपल्या हक्कासाठी जनआंदोलन उभा करायचे आहे.यासाठी आपण सर्वांनी एकत्र येवून आपल्या पुनर्वसनला गेलेल्या जमिनी ताब्यात घेण्यासाठी एकत्र लढा उभा करण्याची गरज आहे.दौंड तालुक्यातील काही दलाल धरणग्रस्त खातेदारांच्या मुलाला व नातू यांना बोगस जमिन वाटप केल्या आहेत.ते दलाल दौंड तालुक्यातील मोठ्या नेत्यांचे जवळीक कार्यकर्ते आहेत.हा दौंडचा मोठा नेता कोण आहे.ते ही दौंड तालुक्यातील सामान्य व गोरगरीब जनतेच्या समोर येणार.यांची दलाली थांबवण्यासाठी माहिती सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य,त्रिदल सैनिक सेवा संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या माध्यमातून मोठा लढा उभा केल्याने दौंड तालुक्यातील धरणग्रस्तांना वाटप बंद केली आहे.अगोदर पन्नास टक्के बोगस वाटप झालेले क्षेत्र काढा व पुनर्वसनाचा शेरा कमी करून मुळ मालक व त्यांच्या वारसांना क्षेत्र देण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.तरी दौंड तालुक्यातील ज्या लोकांचे क्षेत्र पुनर्वसनला गेले आहे.त्या लोकांनी एकत्र येवून मोठे जनआंदोलन उभा करायचे आहे.त्यासाठी आता गावोगावी मिटींग होणार आहे.पुनर्वसनाचा शेरा कमी होऊ नये म्हणून दौंड तालुक्यातील मोठा नेता काम करत आहे.तो दौंड तालुक्यातील नेता कोण आहे? हा प्रश्न दौंड तालुक्यातील सामान्य व गोरगरीब जनतेला पडला आहे.आज ज्या लोकांच्या जमिनी पुनर्वसनाला गेल्या आहेत ते लोक आज भूमिहीन झाले आहेत.आज प्रश्न गंभीर झाला आहे त्यामध्ये पन्नास टक्के बोगस वाटप झाल्याने दौंड तालुक्यात खळबळ उडाली आहे.हे आंदोलन मोडीत काढण्यासाठी दौंड तालुक्याचा मोठा नेता काम करत आहे व करणार आहे.त्यासाठी कोणत्याही राजकीय नेत्याला या आंदोलनात घेतले जाणार नाही.व कोणत्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांचा समावेश या आंदोलनात होऊन दिला जाणार नाही.ही बातमी सर्व दौंड तालुक्यातील ग्रुपमध्ये पोहचवण्यासाठी व दौंड तालुक्यातील ज्या लोकांच्या जमिनी पुनर्वसन गेल्या आहेत.त्या लोकांपर्यंत हा मॅसेज ही बातमी पोहचविण्यासाठी आपण सर्व दौंड तालुक्यातील ज्या लोकांच्या जमिनी पुनर्वसनला संपादित झाल्या आहेत.त्यांचे काम हे आहे की,ही बातमी घरोघरी पोहचली पाहिजे यासाठी आपण सर्वांनी रात्रीचे दिवस करून आपल्या हक्काच्या जमिनी माघारी घेण्यासाठी दौंड तालुक्यात जनआंदोलन उभा करण्यात येणार आहे.या जनजागृती अभियानाला सुरुवात होणार आहे.संपर्क ८९८१७७७१७१ या नंबरवर संपर्क करा.आपल्याला पुर्ण माहिती दिली जाईल.
0 टिप्पण्या