प्रतिनिधी/दौंड
दौंड तालुक्यातील सामान्य व गोरगरीब जनता व शेतकरी माय-माऊली यांच्या जमिनीच्या नोंदी लावण्यासाठी गाव कामगार तलाठी,मंडल अधिकारी हजारो रूपयांची मागणी करत आहे.त्यामुळे शेतकरी व सामान्य व गोरगरीब जनतेच्या तीन ते चार महिन्यापासून नोंदी लावण्याचे रखडले आहे.नोंदी लावणे एकवीस दिवसात बंधनकारक आसताना नोंदी का लावल्या नाहीत?फक्त नि फक्त आर्थिक देवाण-घेवाण न केल्यामुळे नोंदी लागत नाही अशी चर्चा तालुक्यात चालू आहे.या महसूल कर्मचारी यांना शासन पगार देत नाही का?अशा ही चर्चेला दौंड तालुक्यात उधाण आले आहे.दौंड तालुक्यातील त्रिदल सैनिक सेवा संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या माध्यमातून दौंड तालुक्यातील सामान्य व गोरगरीब जनता व शेतकऱ्यांच्या नोंदी लावण्यासाठी जागोजागी मदत केंद्र काढण्यात आले आहे.ज्यांच्या नोंदी राहिल्या आहेत.त्यांनी संपर्क ८९८१७७७१७१ या नंबरवर संपर्क करा.आपली नोंद लावण्यासाठी एकही रूपया खर्च येणार नाही.आपल्या न्याय हक्कासाठी दौंड तालुक्यात त्रिदल सैनिक सेवा संघ महाराष्ट्र राज्य व माहिती सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्याचे पदाधिकारी उपोषण व आंदोलन करून न्याय देणार आहे.तरी गाव कामगार तलाठी व मंडल अधिकारी यांच्याकडे नोंदीचे प्रकरण देताना त्याच प्रमाणाच्या एका झॅराक्सवर गाव कामगार तलाठी व मंडल अधिकारी यांचा सही शिक्का घ्या व आपली नोंद एकवीस दिवसात नाही लागली तर त्या गाव कामगार तलाठी,मंडल अधिकारी यांच्यावर कारवाई होऊ शकती व जो पर्यंत कारवाई होणार नाही तोपर्यंत त्रिदल सैनिक सेवा संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या माध्यमातून उपोषण व जनआंदोलन उभा करण्यात येणार आहे.दौंड तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांच्या व सामान्य व गोरगरीब जनतेच्या तीन ते चार महिन्यापर्यंत ज्या नोंदी राहिल्या आहेत.त्या नोंदी वार सोमवार दिनांक १९ मार्च २०२४ पर्यंत नाही झाल्या तर पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करण्यात येणार आहे.मा.तहसीलदार अरूण शेलार साहेब हे कार्यक्षम अधिकारी आहेत.परंतू हा प्रकार काय घडत आहे.याकडे मा.तहसिलदार साहेबांनी लक्ष द्यावे.दौंड तालुक्यातील सर्व गाव कामगार तलाठी व मंडल अधिकारी यांना लेखी आदेश देवून दौंड तालुक्यातील सामान्य व गोरगरीब जनता व शेतकऱ्यांच्या नोंदी लावण्याचे आदेश द्यावेत.जे गाव कामगार तलाठी व मंडल अधिकारी आपल्या आदेशाचे पालन करत नसतील तर त्यांना त्वरीत निलंबित करावे.आता दौंड तालुक्यातील सामान्य व गोरगरीब जनता व शेतकरी गप्प बसणार नाहीत.दौंड तालुक्यातील सामान्य व गोरगरीब जनतेची आर्थिक देवाण-घेवाण,दिशाभूल व फसवणूक करण्याचा पर्यत्न केला तर त्रिदल सैनिक सेवा संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेचे पदाधिकारी गप्प बसणार नाहीत.
0 टिप्पण्या