दौंड तालुक्यातील महसूल विभागाकडून शेतकर्यांची आर्थिक लुटमार थांबवण्यासाठी त्रिदल संघटनेचे आमरण उपोषण.....संदीप लगड

दौंड तालुक्यातील महसूल विभागाकडून शेतकर्यांची आर्थिक लुटमार थांबवण्यासाठी त्रिदल संघटनेचे आमरण उपोषण.....संदीप लगड

प्रतिनिधी :- दौंड 
दौंड तालुक्यातील सामान्य व गोरगरीब जनतेची व शेतकरी माय-माऊली यांची महसूल विभागाकडून होणारी आर्थिक लुटमार थांबवण्यासाठी त्रिदल सैनिक सेवा संघ महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष मा संदीप लगड रिंगणात उतरले आहेत.तहसिल रेकाॅड रूम व गाव कामगार तलाठी,मंडल अधिकारी यांच्याकडून दररोज शेतकर्यांची कामे करण्यासाठी हजारो रूपयांची मागणी करूनही व शेतकर्यांनकडून आर्थिक देवाण-घेवाण करून सुध्दाक कामे वेळेवर होत नाही.दौंड तालुक्यातील सामान्य व गोरगरीब जनतेची व शेतकर्यांची महसूल विभागाकडून आर्थिक लुटमार,फसवणूक थांबवण्यासाठी वार सोमवार दिनांक १९ मार्च २०२४ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय पुणे या ठिकाणी बेमुदत आमरण उपोषण करण्यात येणार आहे.
सन २०१६ रोजी पुणे जिल्ह्यातील सामान्य व गोरगरीब जनतेची व शेतकर्यांची महसूल विभागाकडून आर्थिक लुटमार थांबवण्यासाठी दिनांक १९ जानेवारी २०१६ ते २५ जानेवारी २०१६ रोजी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सात दिवस अमरण उपोषण केल्यानंतर माहिती सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या सर्व मागण्या मान्य झाल्या होत्या.त्रिदल सैनिक सेवा संघ महाराष्ट्र राज्य व माहिती सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष मा संदीप लगड यांनी सामान्य व गोरगरीब जनता व शेतकर्यांची जनजागृती करण्यासाठी तहसिल कार्यालय परिसर,गाव कामगार तलाठी कार्यालयात बॅनर लावण्यात आले होते.महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग शासन निर्णय क्रमांक:योजना-२०१३/प्र.क्र.९३/ई-१०,३२ वा मजला,सेंटर १ इमारत,जागतिक व्यापार केंद्र,कफ परेड मुंबई-४०० ००५ दिनांक: १८मार्च, २०१४
(१). शासन निर्णय महसूल व वन विभाग क्र.संकीर्ण-२०११/(प्र.क्र.१७८/११)/ई-१० दि.१३.११.२०११
(२). नियोजन विभाग मंत्रालय, मुंबई-३२ यांचेपत्र क्र. डीएपी-१०१३/प्र.क्र.४४९/कार्यासन१४८१,दि.२३.१०.२०१३
वरील जो शासन निर्णय लागू करण्यासाठी व दौंड तालुक्यातील सामान्य व गोरगरीब जनता व शेतकर्यांची महसूल विभागाकडून आर्थिक लुटमार थांबवण्यासाठी त्रिदल सैनिक सेवा संघाचे महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष मा संदीप लगड यांनी मोठा निर्णय घेतला आहे.या मागण्या दिनांक १९ मार्च २०२४ पर्यंत मागणी मान्य न झाल्यास दिनांक १९ मार्च २०२४ रोजी जिल्हाधिकारी पुणे कार्यालयासमोर बेमूदत आमरण उपोषण करण्यात येणार आहे.याच पध्दतीने महाराष्ट्र राज्यात सैनिक व सैनिक परिवाराच्या वतीने प्रत्येक तालुक्यात सामान्य व गोरगरीब जनता व शेतकर्यांची आर्थिक लुटमार व फसवणूक,दिशाभुल थांबवण्यासाठी त्रिदल सैनिक सेवा संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या