समाजरत्न कै.राजेंद्रभाऊ पाटील यांच्या स्मरणार्थ पिलीव यात्रेत पुकळे परिवाराकडून मोफत पिण्याच्या पाण्याची सोय

समाजरत्न कै.राजेंद्रभाऊ पाटील यांच्या स्मरणार्थ पिलीव यात्रेत पुकळे परिवाराकडून मोफत पिण्याच्या पाण्याची सोय


पिलीव येथील महालक्ष्मी देवीची 10 दिवस मोठ्या प्रमाणावर यात्रा भरते.पश्चिम महाराष्ट्रातील जनावरांची तसेच माणसांची मोठी यात्रा म्हणून पिलीव यात्रा प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश अशा विविध राज्यातून लाखो भाविक या यात्रेसाठी येत असतात. त्या यात्रेकरूंना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे या उद्देशाने समाजरत्न कै. राजेंद्रभाऊ पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांचे नातू शिवराज पुकळे व परिवाराने मोफत पिण्याच्या पाण्याची सोय केलेली आहे. देशी जनावरांची बैलांची मोठी आवक पिलीव यात्रेत असते कै.राजेंद्रभाऊंना पहिल्यापासूनच जनावरांवर प्रचंड प्रेम होते. राजेंद्रभाऊ सुद्धा दरवर्षी त्यांचे बैल खोंड घेऊन यात्रेमध्ये मुक्कामी राहत असत परंतु नुकतेच त्यांचे निधन झाल्यामुळे त्यांच्या स्मरणार्थ पुकळे परिवाराने सामाजिक बांधिलकी जपत पाणी वाटपाचा उपक्रम हाती घेतलेला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या