मुलगा पाहिजे,वंशाचा दिवा म्हणून फक्त मुलाकडे पाहिले जाते.पण हे वाक्य मोडीत काढत फक्त वंशाचा दिवा मुलगा नसून मुलगी ही दिव्याची वात असते.माळशिरस येथील गुजरे दाम्पंत्यानी वंशाचा दिवा म्हणून मुलीला दिली पसंती.श्रीनाथ विद्यालय व ज्युनियर कॉलेज माळशिरस याठिकाणी प्राचार्य पदावर असलेले योगेश गुजरे व सोनाली गुजरे यांनी दोन मुलींवर कुटुंब नियोजन करुन समाजापुढे आदर्श ठेवला.शुक्रवार व मंगळवार या दिवशी जन्मलेल्या रिया व सिया या मुली म्हणजे माझी लक्ष्मी आहेत असे ते मानतात.
मुलगी वाचवा, स्त्री भृणहत्या थांबवा असे केवळ दुसऱ्याना पुस्तकी ज्ञान देण्याऐवजी, शिक्षक क्षेत्रात असलेले गुजरे सरांनी समाजापुढे एक आदर्श ठेवला.आज प्रत्येक क्षेत्रात मुली आघाडीवर असून मुलगी वारसदार का होऊ शकत नाहीत.म्हणूनच हा निर्णय गुजरे दाम्पंत्यानी घेतला.आज आमच्यामुळे मुलींची ओळख झाली, उद्या मुली आमची ओळख करुन देतील, हेच आमचे कर्तव्य राहील अशा शब्दांत भावना व्यक्त केल्या.
0 टिप्पण्या