कात्रज मधिल सच्चियायमातानगर येथील बांदोडकर प्राथमिक शाळा व पुष्पादेवी दुगड माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घेतले पांडुरंगाचे दर्शन.
प्रत्यक्षपने पंढरपुर ला जाता नाही आले म्हणून काय झाले.. पण आमच्या भागातील पांडुरंगाचे दर्शनासाठी विद्यालयातून दिंडी निघाली ती विद्यार्थी व पालकांना घेवुन..डोक्यावर टोपी,कपाळावर बुक्का,गळ्यात तुळसीची माळ,डोक्यावर तूळस,हातामध्ये पताका,तर काही विद्यार्थी पांडुरंगाच्या व रुक्मिणीच्या वेशात विठ्ठल नामाचा गजर करत,पर्यावरण,
स्त्री-सक्षमिकरण,दहशतवाद हे मुद्दे व हातात प्रबोधनपर फलक घेवुन विद्यार्थी व सोबत पालकही दिंडीत टाळ व ढोल-ताशे वाजवत,लेझिम खेळत विठ्ठल नामाच्या जयघोष करत सहभागी झाले.परिसरामध्ये प्रबोधन पर फेरी मारून झाल्यावर
मंदिरात पांडुरंगाची आरती झाली.व विद्यार्थी,पालक,शिक्षक यांनी फुगडीसाठी फेर धरला तर काही विद्यार्थ्यांनी भजन गायले..आनंदी आणी उत्साही वातावरणात दिंडी पार पडली.या नंतर सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केले गेले.
महाराष्ट्राच्या धार्मिक संस्कृतीची व भक्तीची ओळख या द्वारे विद्यार्थ्यांना झाली.
अशी माहिती दोन्ही विद्यालयाचे मुख्याध्यापक सौ.शुभांगी घोलप व दिपक खैरे यांनी दिली.
सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ.सुहासिनी काळे यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडी चे आयोजन करण्यात आले.
0 टिप्पण्या