युवा नेते राहुल (मामा) रुपनवर मित्रपरिवार व आमदार रामभाऊ सातपुते युवा मंच मांडवे यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य खुल्या कबड्डी स्पर्धांचे आयोजन
प्रतिनिधी/सचिन रणदिवे
मौजे मांडवे येथे माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार रामभाऊ सातपुते यांच्या वाढदिवसानिमित्त दि.12/03/2023 रोजी दुपारी 12 वाजता भव्य खुल्या कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून प्रथम बक्षीस 51 हजार, द्वितीय बक्षीस 31 हजार, तृतीय बक्षीस 21 हजार, चतुर्थ बक्षीस 11 हजार अशाप्रकारे बक्षीस दिले जाणार आहेत. नियम व अटी 1) पंचांचा निर्णय अंतिम राहील 2)खेळाडूंची शारीरिक जबाबदारी स्वतःवर राहील 3)चोरंगी मॅचेस खेळल्या जाणार नाहीत 4)मॅचेस मातीत होतील या कार्यक्रमाचे आयोजन युवा नेते राहुल (मामा) रुपनवर मित्रपरिवार व आमदार रामभाऊ सातपुते युवा मंच मांडवे यांच्यावतीने पुणे पंढरपूर रोड अहिल्यादेवी चौक मांडवे या ठिकाणी करण्यात आले आहे तरी या भव्य खुल्या कबड्डी स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग नोंदवावा असे आव्हान आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
0 टिप्पण्या