दौंड तालुक्यातील तहसिल कार्यालयातील झिरो कामगार हटवावेत अन्यथा आमरण उपोषण-संदीपभाऊ लगड
दौंड तालुक्यातील तहसिल कार्यालय,मंडळ अधिकारी कार्यालय,गाव कामगार तलाठी कार्यालय यांच्या कार्यालयात झिरो कामगार यांनी धुमाकूळ घातला आहे.या धुमाकूळामध्ये दौंड तालुक्यातील सामान्य व गोरगरीब जतनतेची व शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लूटमार केली जाते.ही सामान्य व गोरगरीब जनता व शेतकर्यांची मोठ्या प्रमाणात चाललेली आर्थिक लुटमार थांबवण्यासाठी मा.तहसिलदार यांनी प्रत्येक महसूल विभागाला पत्र व्यवहार त्वरीत करावा.ज्या महसूल विभागामध्ये झिरो कामगार आढळल्यास त्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी.दौंड तालुक्यात प्रत्येक गाव कामगार तलाठी कार्यालय व मंडळ अधिकारी कार्यालयात जे झिरो कामगार आहेत ते दौंड तालुक्यातील सामान्य व गोरगरीब जनता व शेतकऱ्यांकडून पैस्याची प्रत्येक कामासाठी मागणी करतात.पैसे नाही दिले तर की,महसूल कर्मचारी झिरो कामगाराचा वापर फक्त नि फक्त पैसे गोळा करण्यासाठी केला जातो.त्यासाठी मा.तहसीलदार यांनी स्वतःहा सर्व विभागाची मिटींग बोलून सर्व महसूल कर्मचारी यांना लेखी आदेश व सुचना द्याव्यात.अन्यथा दौंड तहसिल कार्यालय,मंडळ अधिकारी कार्यालय,गाव कामगार तलाठी कार्यालय,या सर्व वरील कार्यालयातील झिरो कामगार त्वरीत न हटविल्यास त्रिदल सैनिक सेवा संघ महाराष्ट्र राज्य,माहिती सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने वार सोमवार दिनांक १९/०३/२०२४ रोजी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करण्यात येणार आहे.
0 टिप्पण्या