बारामतीत बंडातात्या कराडकर यांच्या प्रतिमेला जोडे मारत दहन ! केले होते सुप्रिया ताई सुळे यांच्या विरोधात वक्तव्य !


बारामती लोकसभा मतदार संघाचे खासदार सुप्रिया सुळे यांच्या बद्दल सातारा या ठिकाणी बंडा तात्या कराडकर यांनी दारू विषयावरून अपमानकारक अपशब्द वापरल्याबद्दल बारामती तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने बंडातात्या कराडकर यांच्या पुतळ्याचे दहन करून व जोडे मारून तीव्र शब्दात जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. निषेधानंतर बंडातात्या कराडकर यांच्यावर कायदेशीर रित्या गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी याची मागणी केली.
याकरता बारामती शहर पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक गणेश निंबाळकर यांना तक्रारीचे निवेदन देण्यात आले.

 
यावेळी बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते पुणे जिल्हा समाज कल्याण दक्षता व नियंत्रण समितीचे सदस्य साधू बल्लाळ बारामती तालुका विद्युत वितरण नियंत्रण समितीचे अध्यक्ष , आदीबरोबर तालुका व शहरातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या