रोडिअम ऑन ॲल्युमिना केमिकल गेले चोरीला एकूण 5 कोटी 47 लाख 20 हजार 345 रूपये किंमतीचे ...कुरकुंभ औद्योगिक वसाहत.

 

दौंड 
 कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील इटर्निस फाईन केमिकल्स लिमिटेड कंपनीच्या कॅटॅलिस्ट रूममधून अज्ञात चोरट्याने अमेरिकन कंपनीकडून आलेले २० किलो रोडिअम ऑन ॲल्युमिना नावाचे एकूण ५ कोटी ४७ लाख २० हजार ३४५ रूपये किंमतीचे केमिकल चोरीला गेले असून यासंदर्भात दौंड पोलिसात गुन्हा दाखल झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. दौंड पोलिसांनी इटर्निस फाईन केमिकल्स कंपनीच्यावतीने विष्णु बाजीराव डुबे ( रा.रक्षकनगर, गोल्ड, बिल्डींग नंबर बी-3 फलॅट नंबर ३०३, खराडी, पुणे ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून माहिती दिली. फिर्यादीमध्ये कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील इटर्निस फाईन केमिकल्स लिमिटेड कंपनीच्या प्लाॅट नंबर डी/९/१,९/२,९/३ आणि डि/१५ मधील कॅटॅलिस्ट रूममधून  १ कोटी ५० लाख ८६ हजार ९४३ रूपये किंमतीचे १० किलो आलेले जाॅनसन मॅथे नावाचे अमेरिकन कंपनीचे बाॅक्स त्याची एका किलोची किंमत १५ लाख ८ हजार ६९४ होती.


तर रोडिअम ऑन ॲल्युमिना हे १० किलो केमिकल त्याची किंमत ३ कोटी ९६ लाख ३३ हजार ४४२ रूपये आहे. त्यांची प्रत्येक किलो किंमत रूपये ३९ लाख ६३ हजार ३४४ रूपये प्रमाणे होती. ते जाॅनसन मॅथे नावाचे अमेरिकन कंपनीचे बाॅक्स होते. दोन्ही मिळून एकूण ५ कोटी ४७ लाख २० हजार ३८५ रूपये किंमतीची चोरी झाली.

 याप्रकरणी कंपनीच्यावतीने बुधवारीरात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात चोरटयाविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखालील उपनिरीक्षक सुशिल लोंढे करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या