राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक सत्यवान गोगावले यांच्या आशिर्वादाने शासनाच्या महसुलास हानी. onyx इमारतीमध्ये अवैध पद्धतीने शोहो पब आणि त्यामध्ये विना परवाना दारू विक्री सुरू.…!

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक सत्यवान गोगावले यांच्या आशिर्वादाने शासनाच्या महसुलास हानी...!



दिनांक :- १ जुन २०२५
पुणे-मुंढवा 
मुंढवा परिसरातील ओनिक्स इमारतीच्या १२ व्या मजल्यावर शोहो नावे पब चालू असल्याची घटना उघडकीस आली आहे.शोहो पब चालविण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने कोणत्याही प्रकारचा मद्य परवाना दिलेला नसताना अवैध पद्धतीने पब मध्ये विक्री काल रात्री सुरू होती.या सुरू असणाऱ्या पबची माहिती घेतली असता शोहो हा पब राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक यांच्या आशिर्वादाने सुरू आहे.हा आशीर्वाद फक्त मासिक हफते दिल्याने आहे.हे घटनास्थळावरून समजले.

शासनाला महसूल प्राप्त होण्यासाठी दारू विक्रीचे परवाने दिले जातात.परंतु असे भ्रष्ट अधिकारी शासनाच्या महसुलाची हानी करतात आणि आपले खिसे गरम करून शासनाची फसवणूक करीत आहेत. रात्री १:३०am पर्यंत आपल्या कार्यक्षेत्रात ड्यूटी करणे आवश्यक असताना ही कार्यक्षेत्रात असे प्रकार केवळ पैश्यासाठी केले जात आहेत.त्यामुळे पोर्शे सारख्या अपघात प्रकरणाची पुनरावृत्ती होणे टाळता येणार नाही. यासाठी केवळ मुंढवा येथील निरीक्षक सत्यवान गोगावले जबाबदार राहतील.अश्या प्रकारचे भ्रष्ट अधिकारी यांच्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक कारवाई करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या