साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त जि प केंद्र शाळा मारकडवाडी येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप
मौजे मारकडवाडी येथे साहित्यरत्न साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 102 व्या जयंती व स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त दलित महासंघ व माहिती सेवाभावी संस्थेचे सचिन रणदिवे यांच्या वतीने जिल्हा परिषद केंद्र शाळा मारकडवाडी या ठिकाणी शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जयराम नरळे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे नातेपुते पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर, माजी पंचायत समिती सदस्य मधुकर भाऊ पाटील,नगरसेवक सचिन आप्पा वावरे तर या कार्यक्रमासाठी उपस्थित
दलित महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष केरबा लांडगे, माहिती सेवाभावी संस्थेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष महेंद्र साठे, सरपंच अमित आण्णा वाघमोडे-पाटील,जि प केंद्र शाळा मारकडवाडीचे मुख्याध्यापक मेटकरी सर, दैनिक पुण्यनगरीचे माळशिरस तालुका प्रतिनिधी श्रीमंत बनकर, पत्रकार अमोल साठे, योगेश देशमुख,आबा मारकड,बबन दादा वाघमोडे, श्रीमंत रणदिवे, रुपेश लांडगे,आप्पाजी मारकड,पोपट जानकर,बापुशेठ वाघमोडे,तानाजी नानवर, बापु पिसाळ, लक्ष्मण मारकड, सुनील ठवरे, सोमनाथ वगरे, दतु मारकड,शेखलाल शेख, पिंटू शेंडगे, महेश रणदिवे यांच्या सह शिक्षक, शिक्षिका व आदी मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुंढे सर यांनी केले तर आभार साबळे सर यांनी मानले.
या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा परिषद केंद्र शाळा मारकडवाडी येथील मुख्याध्यापक सर्व शिक्षक शिक्षिका यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
0 टिप्पण्या