महिला आयोगाने दखल घेत पोलीस आयुक्तांना दिले निर्देश…!पोलिस निरीक्षक पुराणिक मारहाण केलेल्या प्रकरणी......

महिला आयोगाने दखल घेत पोलीस आयुक्तांना दिले निर्देश…!पोलिस निरीक्षक पुराणिक मारहाण केलेल्या प्रकरणी......



पुणे  
पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक यांनी तीन दिवसापूर्वी एका नागरिकाला शिवीगाळ करून मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. याप्रकरणी एका महिलेनी राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली होती. याची महिला आयोगाने दखल घेऊन पुणे पोलीस आयुक्तांना संबंधित प्रकाराचा कसून तपास करण्याचे निर्देश दिले आहेत.

एका महिलेने राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली. याबबतीत एका महिलेची तक्रार महिला आयोगास प्राप्त झाली असून यापुर्वीही एका महिलेला अशीच मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. या प्रकरणी योग्य तपास करण्याबाबत पुणे पोलीस आयुक्तांना निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहिती महिला आयोगाने ट्विट करुन दिली आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक हे काही लोकांना शिवीगाळ करत मारहाण केल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमामध्ये प्रसारित होत आहे याबाबतीत एका महिलेची तक्रार महिला आयोगास प्राप्त झाली आहे. यापु्र्वीही एका महिलेला अशीच मारहाण केल्याचे तक्रारीत नमुद केले आहे 

दरम्यान, मागील काही दिवसापासून राजेश पुराणिक यांनी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन नंबर धंदेवाल्यांना सालो कि पळो करून सोडले होते. या व्हिडिओ मध्ये पुराणिक चौकशी करीत आहेत यात गैर काही नाही मात्र आरोपींना शिव्या देणे आणि मारहाण हे योग्य नाही. याप्रकरणी महिला आयोगाने योग्य तो तपास करण्याबाबत पुणे पोलीस आयुक्तांना निर्देश देण्यात आले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या