लोणी देवकर ते निमगाव रस्त्याच्या कामाची चौकशी करून ठेकेदार यांच्या कारवाई करण्याची मनसे व बहुजन ब्रिगेडची मागणी.....!

लोणी देवकर ते निमगाव रस्त्याच्या कामाची चौकशी करून ठेकेदार यांच्या कारवाई करण्याची मनसे व बहुजन ब्रिगेडची मागणी...!



प्रतिनिधी/ इंदापूर

इंदापूर तालुक्यातील लोणी देवकर ते निमगाव हा रस्ता अतिशय निकृष्ट दर्जाचे काम करून बनविण्यात आलेला आहे,त्यामध्ये वापरलेले मटेरियल निकृष्ट दर्जाचे असून रस्ता हा हाताने उचकटून निघत आहे.

रस्त्याच्या कामामध्ये कोणत्याही प्रकारची गुणवत्ता दिसून येत नाही,रस्त्याच्या कामामध्ये मोठया प्रमाणावर भ्रष्टाचार झाला असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे, रस्त्याचे काम चालू असताना जबाबदार अधिकारी उपस्थित होते का नव्हते हा प्रश्न उपस्थित होत,संबंधित बांधकाम विभागाचे प्रमुख अधिकारी आणि शाखा अभियंता यांनी रस्त्याच्या कामामध्ये भ्रष्टाचार केला असल्याचे दिसून येत आहे, आणि ठेकेदाराला पाठिशी घालून उपविभागीय अभियंता व शाखा अभियंता यांनी हा रस्ता निकृष्ट दर्जाचा बनविला आहे,त्यामुळे आपण या रस्त्याच्या गुणवत्ता नियंत्रण विभागामार्फत चौकशी करावी आणि दोशी आढळणाऱ्या उपअभियंता,शाखा यांच्यावर कारवाई करून ठेकेदाराला काळ्या यादीमध्ये टाकावे अन्यथा आपल्या कार्यालयासमोर दिनांक ३०/९/२२ रोजी तीव्र स्वरूपात ठिय्या आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी .

आसा इशारा मनसे चे इंदापूर तालुका उपाध्यक्ष व बहुजन ब्रिगेड चे पुणे जिल्हा संघटक अविराज माने यांनी दिला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या