दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. संग्राम डांगे ५ हजार रुपयांची लाच घेताना ACB च्या जाळ्यात…!

दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. संग्राम डांगे ५ हजार रुपयांची लाच घेताना ACB च्या जाळ्यात…!

दौंड 
गेल्या आठ दिवसापूर्वी दौंड तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यक ४ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडल्याची घटना ताजी असतानाच, आता दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. संग्राम डांगे यांनी दुबार विवाह नोंदणी प्रमाणपत्र देण्यासाठी ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. या घटनेमुळे दौंड शहरात मोठी खळबळ उडाली.दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. संग्राम डांगे यांच्यासह शिपाई खोत असे रंगेहाथ पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी एका व्याक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचे विवाह नोंदणीचे प्रमाणपत्र हरवले होते. त्यांना वैयक्तिक कामानिमित्त विवाह नोंदणीचे प्रमाणपत्र लागणार होते. दुबार विवाह नोंदणी प्रमाणपत्र एका दिवसात देण्यासाठी दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. डांगे व शिपाई खोत यांनी ५ हजार रुपयांची मागणी केली होती. याप्रकरणी तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.मिळालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दौंड उपजिल्हा रुग्णालयात सापळा रचून, दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. संग्राम डांगे व शिपाई खोत यांना ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. तक्रारदार व लाच स्वीकारणारे यांचे जाबजबाब सुरू असून याप्रकरणी दौंड पोलीस गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू झाले आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या