दौंड तालुका प्रतिनिधी, आकाश लगड
नवरात्र मध्ये राक्षसांचा नाश करून जनतेच्या रक्षणासाठी आई भवानीने स्त्रीशक्तीचा आदर्श समाजाला घालून दिला तोच आदर्श अंतकरणात ठेवून माँ साहेब जिजाऊनी नवरात्र मध्ये शत्रूला मातीत घालून स्वतंत्र हिंदवी स्वराज्य स्थापन करणारा मुलगा माझ्या पोटी जन्माला घाल! असं मागणं आई भवानीला मागितलं,तेच मागणं आज समाजाने आई भवानीला मागून समाजातील राक्षसी वृत्ती संपुष्टात आणावी आणि देशभक्त तरुण पिढी शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून घडण्यासाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान दरवर्षी श्री दुर्गा माता दौडचे आयोजन करीत असते. यामध्ये सर्व माता-भगिनी, तरूण मोठ्या संख्येने सहभागी होत असतात. दौंड तालुक्यात ही दुर्गामाता दौड उत्साहात पार पडली. दुर्गा माता दौड मध्ये सहभागी होणाऱ्या सर्व शिवभक्तांचे आयोजकांनी आभार मानले आणि पुढच्या वर्षी ही सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.अधिक माहितीसाठी विशाल मिसाळ, सिद्धेश कदम, वैभव काटे, संदीपान वाघमोडे, रवींद्र भगत यांच्याशी संपर्क साधावा (एकत्रित येण्याचे ठिकाण छत्रपती शिवाजी महाराज चौक,दौंड वेळ सकाळी सहा वाजता)
0 टिप्पण्या