फोंडशिरस मेडद या प्रमुख रस्त्याची दुरुस्ती करा अन्यथा दलित महासंघ घालणार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना घेराव..!
फोंडशिरस मेडद या रस्त्याची दयनीय अवस्था सार्वजनिक बांधकाम विभागाचा मनमानी कारभारामुळे नागरिकांना होतोय नाहक त्रास
प्रतिनिधी/माळशिरस
मौजे फोंडशिरस मेडद रोड या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली असून फोंडशिरस चौकापासून मेडद ला जाणारा 2 ते 3 किमी हा रस्ता अतिशय खराब झाला असून सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी हे जाणीवपूर्वक या रस्त्याकडे दुर्लक्ष करत फक्त बघ्याची भूमिका घेत असल्याचे चित्र समोर आले आहे ?
कित्येक दिवसापासून दलित महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस सचिन रणदिवे हे या रस्त्याची दुरुस्ती व्हावी व नागरिकांची जाण्याची सोय व्हावी यासाठी वारंवार सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा करत असून अद्याप पर्यंत कोणतेही दखल घेत नसले कारणाने जर येत्या आठ दिवसात या रस्त्याची दुरुस्ती न केल्यास दलित महासंघाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ.मच्छिंद्र सकटे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना घेराव घालणार असल्याचा इशारा दलित महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस सचिन रणदिवे यांनी दिला आहे. फोंडशिरस हे गाव बारा ते तेरा गावांचे केंद्रबिंदू बनले असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दळणवळण आहे तसेच फोंडशिरस ही प्रमुख बाजारपेठ मानली जाते.
अनेकांना या रस्त्यावरून ये जा करत असताना अपघाताला सामोरे जावे लागत आहे यामुळे हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्ती करून मिळावा.जर कोणाचा अपघात झाला याला जबाबदार कोण असा संतप्त सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे त्यामुळे लवकरात लवकर सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याची दुरुस्ती करून द्यावी अन्यथा इथून पुढील काळामध्ये दलित महासंघ आक्रमक भूमिका घेणार असल्याचे मत दलित महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस सचिन रणदिवे यांनी व्यक्त केले आहे.
0 टिप्पण्या