माळेगाव बारामती रोडला माळेगावचे हद्दीत शिवशाही हाँटेलचे मागे माऴेगाव पोलीसांनी महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलमांतर्गत 65(ई) ,83 प्रमाणे कारवाई करण्यात आली. चेतन बाळु जाधव (रा माऴेगाव बु।। ता बारामती जि पुणे), राहुल राठोड (रा उरुळी कांचन ता हवेली जि पुणे) कारवाई करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत
.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 12/10/2022 रोजी सकाळी 09/30 वा चे सु. माळेगावचे हद्दीत माळेगाव बारामती रोडला शिवशाही हाँटेलचे मागे पत्र्याचे शेडमध्ये आरोपी चेतन बाळु जाधव रा माळेगाव बु। हा माळेगाव बारामती रोडला माळेगावचे हद्दीत शिवशाही हाँटेलचे मागे पत्र्याचे शेडमध्ये गावठी हातभट्टीचे दारुचा साठा साठवुन तो ओळखीचे विकत असल्याचे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर ठिकाणी पोलीस निरीक्षक अवचर यांच्या आदेशान्वये कर्मचारी साऴवे सय्यद, गव्हाणे , शिंदे तसेच कचरे यांनी दोन पंच असे छापा टाकला असता 24,000/- रु किंमतीचे 35 लिटर मापाचे 10 प्लँस्टीकचे काळे कँन्डमध्ये त्यामध्ये अंदाजे 300 लिटर गावठी हातभट्टीची तयार दारु प्रत्येकी दर80 रु लिटर किं अं ---------- 24,000/- रु एकुण येणेप्रमाणे वरील वर्णनाचा माल मिळुन आला. प्लँस्टीकचे काळे कँन्डमधील गावठी हातभट्टीची तयार दारु नाशवंत असल्याने व आणण्याचे साधन नसल्याने जागेवरच तोडफोड करुन नाश केली.
गुन्ह्याविषयी फिर्याद जयसिंग रोहीदास कचरे यांनी दिली. पुढील तपास माळेगाव पोलीस करीत आहेत.
0 टिप्पण्या