माळशिरस तहसिल कार्यालयातील पुरवठा शाखेतील बडे व कदम यांना तहसीलदार यांनी तात्काळ कामावरून काढून टाकण्यात यावे अशी मागणी तहसीलदार माळशिरस यांच्याकडे केली आहे असे माहिती सेवाभावी संस्थाचे पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस सचिन रणदिवे यांनी सांगितले तहसीलदार माळशिरस यांनी या दोन झिरो कर्मचाऱ्यांना कामावरून काढले नाही तर माहिती सेवाभावी संस्था संस्थापक अध्यक्ष संदीप भाऊ लगड साहेब व पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष महेंद्र साठे यांच्या नेतृत्वाखाली तहसिल कार्यालया समोर तीव्र स्वरूपात अर्धनग्न हलगी नाद आंदोलन करण्याचा इशारा माहिती सेवाभावी संस्थेचे पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस सचिन रणदिवे यांनी दिला आहे या दोन झिरो कर्मचाऱ्यांनी माळशिरस तालुक्यातील गोर गरीब जनतेची आर्थिक लूट व गोरगरीब जनतेच्या खिशावर डल्ला मारत असल्याने त्यांना कामावरून कमी करण्यात यावे. हे कर्मचारी आकरा महिन्याच्या कॉन्ट्रॅक्ट बेस कामावर होते. याची मुदत संपून सुमारे 5 वर्ष होऊन गेले आहेत. त्यामुळे या दोन झिरो कर्मचारी बडे व कदम यांनी जनतेची आर्थिक लूट सुरू केली आहे. असे बोलताना माहिती सेवाभावी संस्थेचे पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस सचिन रणदिवे यांनी सांगितले आहे.
0 टिप्पण्या