आज दि 10 जून रोजी ट्रिक्स अभ्यासीकेत सकाळी 11 ला अभ्यासिकेच्या वतीने अभ्यासिकेतील संग्राम आटोळे यांची नुकतीच psi पदी निवड झाली त्यांना तसेच किरण घनवट यांची मंडळ अधिकारी पदी नियुक्ती झाली त्यांना शाल पुष्पगुच्छ व ज्ञानरचनावाद हे पुस्तक भेट देऊन सन्मानित करण्यात आले.तसेच रिया बिनवडे हिला इ.10 वी मध्ये 85%गुण मिळाल्याने psi संग्राम मोरे यांच्या हस्ते गौरवण्यात आले.तसेच यावेळी मराठी नाट्यसृष्टीत अभिनय क्षेत्रात महत्वाची भूमिका बजावणारे अक्षय काळकुटे (बैदा नाटक) यांनाही अभ्यासिकेच्या वतीने सन्मानित करण्यात आले. उपस्थित mpsc अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना संग्रामने अपयशाने खचून जाऊ नका तसेच संयम आणि चिकाटी असेल तर नक्कीच यश मिळते असे सांगितले तसेच psi मुलाखत पात्र विद्यार्थ्यांना त्यांनी मुलाखतीची नेमकी कशी तयारी करायची याबाबतही सविस्तरपणे माहिती दिली.आभार व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता झाली..
0 टिप्पण्या