दिनांक 14 ऑगस्ट 2024 रोजी सामाजिक न्याय विभाग भारत सरकार भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम (एलीम्को), शिवरत्न शिक्षण संस्था शिवपार्वती सार्वजनिक विकास ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमान विद्यमाने राबविण्यात आलेल्या दिव्यांग शिबिरातील लाभार्थ्यांना कृत्रिम अवयव साहित्याचे वाटप तसेच माळशिरस तालुका पंचायत समितीच्या वतीने राष्ट्रीय स्वास्थ्य योजनेच्या आर बी एस के च्या माध्यमातून झालेल्या यशस्वी शस्त्रक्रियाच्या यशोगाथा चे " अमोघ" या ई बुक चे प्रकाशन कार्यक्रम तसेच टीबी निर्मूलन 20 ग्रामपंचायतीचा सत्कार कार्यक्रम खासदार *मा.श्री. धैर्यशील महिते -पाटील* यांच्या हस्ते
व प्रमुख उपस्थित माळशिरस पंचायत समिती येथे संपन्न झाला
यावेळी गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी आर बी एस के ची माहिती सांगितली तसेच आर बी एस के ची टीम गेले अकरा वर्ष कार्यरत आहे यात 0 ते 18 वर्ष या वयोगटातील मुलांची अंगणवाडी, शाळा तसेच विविध कॅम्प आयोजित करून तपासणी करण्यात येते व त्यांच्यात कोणते दोष असल्यास त्याना पूर्ण वैद्यकीय सुविधा पुरविल्या जातात . आतापर्यंत माळशिरस तालुक्यातून,239 मुलांच्या हृदयशत्रक्रिया व 1300 मुलांच्या विविध शस्त्रक्रिया केल्या आहेत.
आर बी एस के टीमचे कार्य अतिशय कौतुकास्पद आहे.या कौतुकास्पद कार्याची दखल घेण्याकरिता गटविकास अधिकारी यांनी त्यांच्या टीम कडून त्यांचे अनुभव ई-बुक स्वरूपात तयार करण्यात आले आहे .*या ई-बुकचे प्रकाशन खासदार माननीय धैर्यशील मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आले हे ईबुक "अमोघ" या नावाने प्रसिद्ध करण्यात आले आहे .अशाप्रकारचे हे देशातील पहिलेच पुस्तक आहे*.
तसेच माळशिरस तालुक्यातील 103 ग्रामपंचायती पैकी 20 ग्रामपंचायतींना टीबी मुक्त च्या दिशेने वाटचाल करणाऱ्या ग्रामपंचायतीला महात्मा गांधी यांचा ब्रांझचा पुतळा व सर्टिफिकेट देऊन गौरविण्यात आले. व त्या ग्रामपंचायतीतील ग्रामसेवक , सरपंच, आरोग्य कर्मचारी अशा सेविका यांचा सन्मान करण्यात आला .
प्रमुख पाहुणे म्हणून बोलत असताना *खासदार धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले की माळशिरस तालुक्यातील अधिकारी कर्मचारी हे ज्या कामासाठी नेमले आहेत ते काम अत्यंत चोखपणे पार पाडतात. गटविकास अधिकारी मनोज राऊत यांचे कौतुक करत म्हणाले की त्यांनी कर्मचाऱ्यांच्या पाठीवर यशाची व कौतुकाची जी थाप टाकली आहे त्यामुळे सर्वांना कार्य करण्याची आणखी प्रेरणा मिळणार आहे तसेच ज्या सरकारी सोयी सुविधा आहेत त्या आपल्या तालुक्यातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवण्याचे काम आजच्या कार्यक्रमाद्वारे होत आहे. तसेच अमोघ या ई बुक चे हिंदी व इंग्रजी आवृत्ती काढून त्याची संपूर्ण देशपातळीवर पोहचविण्याचे कार्य आपण सर्वजण मिळून करूया असे आश्वासन दिले.*
यावेळी गटविकास अधिकारी मनोज राऊत ,डॉ. महेश गुडे , डॉ.रानडे मॅडम, डॉ. मुकुंद जामदार ,डॉ. प्रियंका शिंदे, श्री कोळेकर, डॉ मयुरा काळे, डॉ पोटे, आर बी एस के चे सर्व वैद्यकीय अधिकारी,तालुक्यातील ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक,सरपंच व कर्मचारी,आरोग्य कर्मचारी व इतर मान्यवर उपस्थित होते.
0 टिप्पण्या