पत्रकार बांधवावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी पत्रकार संरक्षण समितीची गरज ... हर्षवर्धन पाटील.!

बावडा प्रतिनिधी २

मौजे निरा नरसिंहपुर येथे शनिवार दि २९ रोजी पत्रकार संरक्षण समितीची स्थापना करण्यात आली कोरोना काळात स्वतःचा जिव धोक्यात गोरगरीबांची प्रामाणिकपणे सेवा करणाऱ्या आशावर्कर,डाँक्टर ,पत्रकार व इतर शासकीय कर्मचारी बांधवांचा कोवीड योध्दा पुरस्काराने सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाचे उदघाटन राज्याचे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करुन करण्यात आले 

पत्रकार बांधवावर दिवसेंदिवस हल्ले होण्याचे प्रमाण देखील वाढले आहे पत्रकार बांधवाच्या संरक्षणासाठी कडक कायदे होण्याची व त्याची तात्काळ अंमलबजावणी होणे ही काळाची गरज आहे पत्रकारांवर होणारे अन्याय थांबवण्यासाठी पत्रकार संघटना व पत्रकार संरक्षण समितीची गरज आहे पत्रकार बांधव आपल्या पत्रकारीते
च्या माध्यमातून समाजातील चुकीच्या घडणाऱ्या घटनाना वाचा फोडून सर्व सामान्यांना नेहमीच न्याय देण्याचा प्रयत्न करतात पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे
 दिवसेंदिवस पत्रकारांची संख्या वाढत आहे इंदापूर शहरात पत्रकार भवनासाठी आम्ही पाठपुरावा करत आहोत 
इंदापूर शहरात पत्रकार भवन व्हावे ही माझी मनापासून ईच्छा आहे या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना राज्याचे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले 

पत्रकार संरक्षण समिती इंदापूर तालुका अध्यक्षपदी प्रथमच बाळासाहेब सुतार यांची निवड झाली असून 
पत्रकार संरक्षण समितीतील पत्रकारांचे व या कार्यक्रमा साठी आलेल्या सर्व पत्रकार बांधवांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो असे या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना सागर मिसाळ म्हणाले पत्रकार संरक्षण समितीच्या वतीने राज्याचे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांचा व पत्रकार संरक्षण समितीच्या पदाधिकाऱ्याचा सन्मान करण्यात आला श्रीराज भरणे,संचालक अप्पासाहेब जगदाळे ,यांनी देखील नवनिर्वाचित पत्रकार संरक्षण समितीच्या पदाधिका ऱ्याचे अभिनंदन केले

या कार्यक्रमाला पाडुरंग तात्या शिंदे ,महादेव घाडगे, उदयसिंह पाटील ,विद्यमान सरपंच अश्विनी सरवदे, सरपंच प्रतिनिधी चंद्रकांत सरवदे माजी सरपंच संतोष मोरे, माजी उपसरपंच विलास ताटे,विजय सरवदे,चेअरमन आनंद काकडे, ग्रामपंचायत सदस्य नितीन सरवदे, संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष अनिलभाऊ चौधरी, जिल्हा अध्यक्ष नाथाभाऊ उंद्रे, रवींद्र खुडे, प्रदेश अध्यक्ष डॉक्टर मोहन वाघ, आशोक आवळे, खुडे मॅडम, यांच्या मार्गदर्शना खाली पत्रकार संरक्षण समितीच्या पत्रकार दिन कार्यक्रम व कोविड योद्धा पुरस्कार व पत्रकार बांधव यांचा सन्मान सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमाची शेवटी अल्पोपहार घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दुनाखे सर यांनी केले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या