महिलेची गळफास घेऊन आत्महत्या.... टेरेसवर आढळला मृतदेह........! लातूर मधील घटना.


लेकीच्या बाळंतपणासाठी जावयाच्या घरी आलेल्या महिलेनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अंतेश्वरी सूर्यकांत चिगळे असं आत्महत्या करणाऱ्या ४५ वर्षीय सासुचं नाव आहे. ही घटना उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली आहे.

अहमदपूर तालुक्यातील हाळणी येथील रहिवासी असलेल्या अंतेश्वरी यांची मुलगी लातूरमधील रामनगर परिसरात राहते. तिच्या प्रसूतीसाठी काही दिवसांपूर्वी अंतेश्वरी जावयाच्या घरी आल्या होत्या. गेल्या एक महिन्यांपासून त्या येथेच राहत होत्या. मात्र सकाळी त्यांनी लेक राहत असलेल्या इमारतीच्यावर असणाऱ्या पाण्याच्या टाकीच्या बाजूने सुरक्षेसाठी असणाऱ्या असणाऱ्या लोखंडी पाईपला गळफास घेऊन आत्महत्या केली.

ही घटना उघडकीस येताच शिवाजी नगर पोलिसांना कळविण्यात आले. पोलीस घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. मृतदेह शवविच्छेदनासाठी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आला. अंतेश्वरी यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकले नाही. या प्रकरणी शिवाजी नगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिस पुढील तापस करत आहेत. अंतेश्वरी यांच्या आत्महत्येमुळे परिसरात खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या