ज्येष्ठ उद्योजक राहुल बजाज यांचं पुण्यात निधन.!





पुणे
देशातील आघाडीचा उद्योग समूह असलेल्या बजाज समूहाची धुरा तब्बल ४० वर्षे यशस्वीरित्या वाहणारे ज्येष्ठ उद्योगपती व बजाज समूहाचे माजी अध्यक्ष राहुल बजाज  यांचं आज पुण्यात निधन झालं. ते ८३ वर्षांचे होते. त्यांच्यावर उद्या अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. राहुल बजाज यांच्या निधनामुळे एक संवेदनशील व समाजाशी नाळ जुळलेला उद्योजक हरपला आहे, अशी भावना देशभरात व्यक्त होत आहे.

नॉन कोविड न्यूमोनियामुळे त्रस्त असलेल्या राहुल बजाज यांच्यावर मागील १५ दिवसांपासून रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार सुरू होते. न्यूमोनियामुळे त्यांचे फुफ्फुस हळूहळू निकामी होत गेले. त्यानंतर हृदयक्रियेवर परिणाम झाल. वृद्धापकाळामुळे त्यांचे शरीर उपचारांना साथ देत नव्हते. त्यामुळं त्यांची प्रकृती उत्तरोत्तर खालावत गेली आणि आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. बजाज समूहाने निवेदन प्रसिद्धीस देऊन त्यांच्या निधनाची माहिती दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या