पतीने पत्नीवर जीवघेणा हल्ला केल्याच्या दोन्ही घटनांनी खळबळ ..! दोन्ही घटनांमधील महिला जखमी .. उपचार सुरू....

डोंबिवलीत कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. पती-पत्नीमध्ये वाद झाल्याच्या दोन घटना घडल्या आहेत. विष्णुनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाने आपल्या पत्नीवर धारदार शस्त्राने हल्ला केला, तर रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतही पतीने आपल्या पत्नीवर भर रस्त्यात जीवघेणा हल्ला केला. या दोन्ही घटनांत महिला जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.

डोंबिवलीत दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन महिला जखमी झाल्या आहेत. घरगुती वादातून पतीने पत्नीवर हल्ला केला आहे. विष्णुनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पतीने घरात घुसून आपल्या पत्नीवर धारदार शस्त्राने वार केले. यात ती गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विष्णुनगर पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. तर रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत भर रस्त्यात पतीने पत्नीवर जीवघेणा हल्ला केला. यात ती देखील जखमी झाली आहे. तिच्यावरही रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यातील आरोपी संशयित पती फरार आहे. त्याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.

डोंबिवली पूर्वेकडील दत्तनगरमध्ये पतीने पत्नीवर धारदार शस्त्राने हल्ला केला. मंगळवारी ही घटना घडली. चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर हल्ला केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. तर दुसरी घटना पश्चिमेकडील सरोवरनगरमध्ये घडली आहे. कौटुंबिक वादातून पतीने पत्नीवर जीवघेणा हल्ला केला. ही घटना सोमवारी घडली होती. या दोन्ही घटनांप्रकरणी अनुक्रमे रामनगर पोलीस ठाण्यात आणि विष्णुनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

डोंबिवली पूर्वेकडील दत्तनगरमध्ये राहणारा सोमनाथ हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. तसेच ती पैसे चोरते असा आरोप तिच्यावर करायचा. यावरून तिला मारहाण करत असे. या त्रासाला कंटाळून पत्नीने सोमनाथची तक्रार पोलीस ठाण्यात करण्याचा निर्णय घेतला. मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास पत्नी पोलीस ठाण्यात जाण्यासाठी रिक्षात बसली असता, पाठीमागून आलेल्या सोमनाथने तिच्यावर चाकूने सपासप वार केले आणि पसार झाला. यात तिच्या मानेवर, पायावर आणि हातावर गंभीर जखमा झाल्या आहेत.

डोंबिवली पश्चिमेकडील सरोवरनगरातही अशीच एक घटना घडली. आरोपी शिवाजी याने त्याच्या पत्नीवर जीवघेणा हल्ला केला. सोमवारी दुपारी ही घटना घडली. पती-पत्नी गेल्या तीन-चार वर्षांपासून वेगळे राहत आहेत. शिवाजी कोणताही कामधंदा करीत नाही. यावरून पती-पत्नीमध्ये सातत्याने वाद व्हायचे. त्यामुळे दोघे वेगवेगळे राहायचे. सोमवारी शिवाजी घरी आला आणि त्याने पत्नीवर धारदार शस्त्राने वार केले. यात पत्नी गंभीर जखमी झाली असून, मुलाच्या तक्रारीवरून शिवाजीविरोधात विष्णुनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, त्याला अटक केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या