चौफुला येथे खुलेआम अवैधरित्या गावठी दारू विक्री सुरू...!


दौंड
केडगाव चौफुला या नावाने ओळखले जाणाऱ्या चौफुल्याला आता अवैध व्यवसायिकदारांनी विळखा घातलाय. प्रगतीपथावर असलेला चौफुला प्रामुख्याने वीट भट्टी व्यवसाय, ट्रॅक्टर, कार गाडी, मोटर सायकल यांचे शोरूम तसेच मोठ्या प्रमाणात असलेले गॅरेज व्यवसाय यामुळे नावलौकिक असलेल्या चौफुल्याचा आता एका गावा एवढा विस्तार झाला आहे. पण आता या चौफुल्यावर अवैधरित्या गावठी दारू तयार करून विकणाऱ्यांनी थैमान घातला आहे. धायगुडे वाडी, इंदिरानगर, सुपा रोड फॉरेस्ट शेजारी मोठ्या प्रमाणात अवैधरित्या गावठी दारू तयार करून ती विक्री केली जाते. 


धायगुडे वाडी मध्ये हायस्कूल शाळा असल्यामुळे धायगुडे वाडीमध्ये येणाऱ्या मुख्य रस्त्याने विद्यार्थ्यांची नेहमीच ये-जा असते याच रस्त्याशेजारी मोठ्या प्रमाणात अवैद्य गावठी दारू तयार करून विकली जाते. त्यामुळे रस्त्यावर नशेत बेधुंद असलेल्या तळीरामांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. यामुळे शाळेमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा नाहक त्रास सहन करत ये- जा करावे लागते. तसेच इंदिरानगर येथे जिल्हा परिषद शाळेच्या शेजारीच दारू विक्री व्यवसाय सुरू आहे. सुपा रोड शेजारी असलेला दारू व्यवसाय हा रोड वरून ये-जा करताना नेहमीच दिसत असतो. तरीदेखील या दारू विक्रेत्यांना पोलीस प्रशासनाची कोणतीही भीती राहिलेली दिसून येत नाही. हे सर्व कोणाच्या आशीर्वादाने चालले आहे? असा प्रश्न स्थानिक महिलांना पडत आहे. चौफुला येथील ही अवैद्य गावठी दारू बंद होईल का? हा प्रश्न देखील महिलांकडून उपस्थित होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या