अवैध धंद्यांवर कारवाई करताना पोलिस कर्मचाऱ्याला दारू विक्रेत्याकडून धक्काबुक्की..
बोरी येथे अवैध धंद्यांवर कारवाई करत असताना पोलिस कर्मचाऱ्याला बेकायदेशीर दारू विक्री करणाऱ्या विक्रेत्याने धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी पोलिसांनी शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी अमोल मधुकर कुचेकर (रा. बोरी) या दारू विक्रेत्यावर गुन्हा दाखल केला आहे.या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल नवनाथ आनंदराव गोलांडे (वय ३६) यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
क्लिक करा आणि वाचा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोरी गावामध्ये अमोल कुचेकर हा अवैध देशी दारू विक्री करीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर सहायक फौजदार बाळासाहेब पानसरे व पोलिस कॉन्स्टेबल नवनाथ गोलांडे हे शुक्रवारी (ता. २७) सायंकाळी साडेसातच्या सुमारास कारवाई करण्यासाठी गेले होते. यावेळी अमोल कुचेकर रस्त्यावर कापडी पिशवीमधून अवैध दारू विकत होता. पोलिसांनी कारवाई करून अवैध दारुसाठा व कुचेकर याला ताब्यात घेत असताना पोलिस कॉन्स्टेबल गोलांडे यांना धक्काबुक्की करून पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. याप्रकरणी पोलिसांनी कुचेकर याला अटक करून त्याच्याकडून ४५० रुपयांच्या देशी दारुसह एक दुचाकी असा ६० हजार रुपयांचा ऐवज जप्त केला.
0 टिप्पण्या