बारामती फार्मसी कॉलेजमध्ये शिकणाऱ्या २० वर्षीय तरुणीची हॉस्टेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या.....?

बारामती 
फार्मसी कॉलेजमध्ये  शिकणाऱ्या एका तरुणीने  हॉस्टेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शरयू संदीप रणवरे  (वय-20 रा. वडापुरी, ता. इंदापूर) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे नाव आहे. ही घटना बारामती तालुक्यातील बऱ्हाणपूर येथील फार्मसी कॉलेजमध्ये घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ  उडाली आहे.

 शरयूने रात्री साडे नऊ ते दहाच्या सुमारास गळफास घेतल्याचे निदर्शनास आले असता उपचारासाठी बारामती हॉस्पिटल मध्ये दाखल केले तेव्हा डॉक्टरांनी मयत म्हणून घोषित केले. त्यानंतर मयत हे सिल्वर जुबली हॉस्पिटल मध्ये पोस्टमार्टमसाठी पाठविण्यात आले. याप्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात  अकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शरयूने कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली हे अद्याप समजू शकले नाही. 
 
कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये  एका उच्च शिक्षीत तरुणीने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.तरुणीने कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली याचा शोध बारामती तालुका पोलीस याचा तपास करीत आहेत


 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या