पुणे
पती-पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना बुधवारी समोर आली आहे. पुण्यातील भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली. एका व्यक्तीने स्वतःच्या पत्नीला आपल्या दोन मित्रांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. शारीरिक संबंध ठेवत असताना पती स्वतः त्या ठिकाणी उभा राहून हे सर्व पाहत होता. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात पती आणि त्याच्या दोन साथीदारांनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
क्लिक करा आणि वाचा
४८ वर्षीय विवाहित महिलेने या प्रकरणी तक्रार दिली आहे. आरोपी पतीने फिर्यादी महिलेला वेळोवेळी मानसिक त्रास दिला. तसेच तिची इच्छा नसतानाही डिसेंबर २०२० मध्ये हडपसर येथील एका लॉजवर एका मित्रांबरोबर शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. त्यानंतर जुलै २०२१ मध्ये कोरेगाव पार्क परिसरातील एका फ्लॅटवर आणखी एका मित्रांसोबत पत्नीला अनैसर्गिक शरीर संबंध ठेवण्यास भाग पाडले. आणि हे सर्व होत असताना आरोपी स्वतः त्या ठिकाणी उभा राहून हे सर्व पाहत होता. या सर्व प्रकरणानंतर फिर्यादी महिलेने आज अखेर भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पतीसह त्याचा दोन मित्रांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0 टिप्पण्या