भारत देशात कारगिल विजय दिवस शासकीय कार्यालयात,ग्रामपंचायत,काॅलेज,शाळा व गावोगावी साजरा झाला पाहिजे.संदीप लगड..................!


प्रतिनिधी  :-  दौंड 
कारगिल विजय दिवस पुर्ण भारत देशात साजरा झाला पाहिजे याचा जी आर केंद्र शासन व महाराष्ट्र शासनाने काढून अमलबजावणी करण्यात आली पाहिजे असं मत त्रिदल सैनिक सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष संदीप लगड यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले आहे.
कारगिल विजय दिवस हा शासकीय कार्यालय,ग्रामपंचायत,शाळेत,काॅलेज,गावोगावी रॅली काढून साजरा करण्यात आला पाहिजे.कारगिल या ठिकाणी भारत व पाकिस्तानची तब्बल ६० दिवस लढाई चालु होती.या लढाईमध्ये भारतीय जवान दोन लाखांहून अधिक जवान या लढाई मध्ये होते.पाचशे सत्तावीस वीर जवानांनी आपले बलिदान भारत मातेसाठी दिले.या लढाई मध्ये कोणाचा मुलगा शहिद झाला,कोणाचा बाप शहिद झाला व कोणाचा भाऊ शहिद झाला,कोणाचा पती शहिद झाला,आजही शहिद कुटुंबियांना शासनान व प्रशासन दरबारात हेलपाटे मारावे लागतात.
कारगिल विजय दिवस हा ऐतिहासिक दिवस आहे.मा.राष्ट्रपती महोदय,मा.पंतप्रधान महोदय,मा.मुख्यमंत्री महोदय,मा.राज्यपाल महोदय यांना त्रिदल सैनिक सेवा संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्यात ज्यांनी देशासाठी बलिदान दिले व जे वीर-शौर्य जवान शहिद झाले.त्या शहिद जवानांच्या कुटुंबियांना जमिन मिळते व जमिन देण्याचा अधिकार मा.जिल्हाधिकारी साहेबांना आहे.परंतु शहिद वीर पत्नी,शहिद माता-पिता व शहिद कुटुंबियांना तलाठी कार्यालय,मंडल अधिकारी कार्यालय,तहसील कार्यालय,जिल्हाधिकारी कार्यालयात तीन ते चार वर्षापासून शहिद कुटुंबियांना शासकीय कार्यालयाचे फेरफटका मारावा लागतात परंतु कामे होत नाही.यासाठी शासनान व प्रशासनाने लक्ष घालून लवकरात लवकर शहिद कुटुंबियांचा प्रश्न मार्गी लावण्याचे काम करावे अशी मागणी मा.मुख्यमंत्री साहेबांनकडे त्रिदल सैनिक सेवा संघाच्या वतीने करण्यात येणार आहे.
पुढील कारगिल विजय दिवस त्रिदल सैनिक सेवा संघाच्या माध्यमातून गावोगावी साजरा करण्यात येणार आहे.असे मत त्रिदल सैनिक सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष संदीप लगड यांनी व्यक्त केले आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या