त्रिदल सैनिक संघ, बारामती मुख्य कार्यालय मध्ये कारगिल विजय दिवस साजरा ......
बारामती -सोमेश्वर
आज दिनांक २६ जूलै कारगिल विजय दिवस निमित्ताने त्रिदल सैनिक संघ, बारामती मुख्य कार्यालय मध्ये कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला. यासाठी संघटनेचे सदस्य तसेच महिला वर्ग उपस्थित राहुन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
श्री. विक्रम जगताप साहेब यांनी प्रस्तावना करत आपल्या आकर्षक प्रभावशैलीत मनोगत व्यक्त केले तसेच प्रत्यक्ष कारगिल युध्दात सहभागी असेलेले जालिंदर रंधवे साहेब, बाळकृष्ण रासकर साहेब यांनी आपला कारगिल युध्दातील प्रत्यक्ष अनुभव सांगितला. हे अनुभव अंगावर शहारे आणणारे होते.समाजातील सर्व स्तरातील नागरिकांपर्यंत असे अनुभव पोहचणे गरजेचे आहे.संघटनेचे अध्यक्ष प्रशांत शेंडकर साहेब यांनी ही आपले मनोगत व्यक्त करत शहीद जवानांना श्रध्दांजली वाहिली.
सर्व उपस्थित सदस्यांना नाश्ता ची सोय स्वखर्चाने श्री.विक्रम धुर्वे साहेब यांनी केली.यानंतर बचत गटाची मिटींग पार पडली आणी सर्व आढावा श्री. विजय गोलांडे साहेब यांनी दिला देण्यात आला.
याप्रसंगी प्रशांत शेंडकर अध्यक्ष,सचिव सुनील लोखंडे,कोषाध्यक्ष विजय गोलांडे,उपाध्यक्ष विठ्ठल भापकर,जालिंदर रंधवे, विक्रम जगताप, दादा जांबळे,दिपक जगताप, बाळू मेमाणे, सतीश गायकवाड, सतीश गायकवाड, बाळकृष्ण रासकर, प्रकाश शितोळे, विशाल गारडे, मिनीनाथ होळकर, राजाराम शिंदे, विक्रम धुर्वे, बचत गट अध्यक्ष, सचिव, आणी सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी संघटनेचे सचिव श्री. सुनील लोखंडे साहेब यांनी आभार मानले .
विक्रम जगताप यांनी सांगितली विजय दिवस विषयी माहिती....
१९७१ च्या भारत-पाक युद्धानंतरही अनेक दिवस लष्करी संघर्ष सुरूच होता. इतिहासानुसार दोन्ही देशांनी केलेल्या अणुचाचण्यांमुळे तणाव वाढला होता. परिस्थिती निवळण्यासाठी, दोन्ही देशांनी फेब्रुवारी १९९९ मध्ये लाहोरमध्ये जाहीरनाम्यावर स्वाक्षरी केली. ज्यामध्ये काश्मीर प्रश्न द्विपक्षीय चर्चेद्वारे शांततेने सोडवण्याचे आश्वासन देण्यात आले होते. पण पाकिस्तानने लपूनछपून आपले सैनिक आणि निमलष्करी दल नियंत्रण रेषेपलीकडे पाठवण्यास सुरुवात केली आणि या घुसखोरीला ‘ऑपरेशन बद्र’ असे नाव देण्यात आले. काश्मीर आणि लडाखमधील दुवा तोडणे आणि सियाचीन ग्लेशियरमधून भारतीय सैन्य हटवणे हा त्याचा मुख्य उद्देश होता. पाकिस्तानचा असाही विश्वास आहे की या प्रदेशातील कोणत्याही तणावामुळे काश्मीर समस्या आंतरराष्ट्रीय समस्या बनण्यास मदत होईल. सुरुवातीला ही घुसखोरी मानली जात होती आणि काही दिवसांत ते बाहेर फेकले जातील असा दावा करण्यात आला होता. पण नियंत्रण रेषेवर शोध घेतल्यानंतर आणि या घुसखोरांच्या डावपेचांमधील फरक शोधून काढल्यानंतर, भारतीय लष्कराच्या लक्षात आले की हल्ल्याची योजना खूप मोठ्या प्रमाणावर होती. यानंतर भारत सरकारने ऑपरेशन विजयच्या नावाने २,००,०००सैनिक पाठवले. २६ जुलै १९९९ रोजी हे युद्ध अधिकृतपणे संपले. या युद्धात ५५० सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आणि सुमारे १४०० जखमी झाले.
0 टिप्पण्या