बारामतीचे ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांच्या घराला आग, आगी मध्ये 35 लाख रुपयांचे नुकसान तर कोणतीही जीवितहानी नाही......!
बारामती
बारामतीतील ज्येष्ठ नगरसेवक तथा विद्या प्रतिष्ठानचे विश्वस्त किरण गुजर यांच्या घराला आज सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास आग लागली. या आगीमध्ये संपूर्ण फर्निचर, कपडे आणि इतर साहित्य जळून खाक होवून मोठे नुकसान झाले आहे.आग कशाने लागली याचे कारण समजू शकले नसले तरी या आगीत मोठे नुकसान झाले आहे.या आगीमध्ये त्यांच्या घराचा एक मजला जळून खाक झाला असून त्याच्यामध्ये काही स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच्या जुन्या तबकड्या, ग्रामोफोन, जुन्या सीडी, विविध पुस्तके, किमती दस्तावेज, अन्य काही वस्तू आगीत भस्मसात झाल्या. या लागलेल्या आगीत गुजर कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
गुजर यांच्या खाटीक गल्ली येथील निवासस्थानी असलेल्या मजल्यावर अचानक आग लागली. किरण गुजर हे नेहमीप्रमाणे नटराज नाट्य कला मंडळात थांबलेले असताना त्यांना या घटनेची माहिती मिळाली. त्यांनी याबाबत बारामती नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाला कल्पना देत घटनास्थळी धाव घेतली.बारामती नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी दाखल होत आग नियंत्रणात आणली. त्यामुळे मोठा धोका टळला.या आगीमध्ये संपूर्ण फर्निचर, कपडे आणि इतर साहित्य जळून खाक होवून मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने या मजल्यावर कोणीही नव्हते. विशेष म्हणजे अग्निशमन दलाने वेळीच आग आटोक्यात आणल्यामुळे इतर मजल्यांवर आगीची धग पोहोचली नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळल्याचे गुजर यांनी सांगितले प्राथमिक माहितीनुसार याआगी मध्ये किमान 35 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली हे कारण अद्याप अस्पष्ट असून शॉर्ट सर्किट मुळे ही आग लागली असावी, असा अंदाज किरण गुजर यांनी व्यक्त केला आहे.
0 टिप्पण्या