बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनिल महाडीक यांनी अमृत महोत्सव १० व ५ कि.मी. मॅरेथॉनचे आयोजन करून केला जल्लोषात साजरा...!
संपूर्ण देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना बारामती उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे व बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनिल महाडीक यांनी अमृत महोत्सव जल्लोषात साजरा करण्यासाठी १० व ५ कि.मी. मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते या मॅरेथॉनला नागरिकांनी चांगलाच प्रतिसाद दिला.
या मॅरेथॉनला बारामती सत्र न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश श्रीमती जे.पी.दरेकर, प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी ए.जे.गिर्हे व न्यायाधीश श्री.अतकिरे यांनी हिरवा झेंडा दाखवून ०६:१५ वाजता गो केला. दौड ही तीन हत्ती चौकमधुन भिगवन रोडने सुरूवात केली. धावण्याचा रूट हा जैन मंदिर, माळावरची देवी, प्रशासकीय भवन, कसबा, देशमुख चौक गांधी चौक,गुणवडी चौक, इंदापूर चौक करीत तीन हत्ती चौकामध्ये फिनिश पॉईंट करण्यात आला. सेल्फी पॉईंटवर अनेकांनी सेल्फी काढत आनंद साजरा केला.यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, विरोधी पक्षनेते आ.अजित पवार यांचे खाजगी सचिव हनुमंत पाटील उपस्थित होते.या सर्व सहभागी मान्यवरांना प्रमाणपत्र देण्यात आले. सर्व कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अनिल साळवे पाटील व सलिम सय्यद यांनी केले.
सदरच्या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, बारामती उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या आदेशान्वये बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक व त्यांचे सर्व अधिकारी कर्मचारी यांनी कार्यक्रम राबवण्यात आला.
0 टिप्पण्या