प्रतिनिधी :- दौंड
सैनिक आपल्या दारी अभियानात अंतर्गत त्रिदल सैनिक सेवा संघाच्या माध्यमातून सैनिक व सैनिक परिवाराच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी व प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रत्येक तालुक्यातील शासन व प्रशासनाला हाताशी धरून सैनिक व सैनिक परिवाराच्या कोणत्याही शासकीय व खाजगी विभागाची अडचण असल्यास दूर करण्यासाठी त्या तालुक्यातील मा.लोकप्रतिनिधी, मा.तहसिलदार,मा.पोलिस निरीक्षक, मा.गटविकास अधिकारी,उपभुमिअधिक्षक,अधिकारी,कृषी अधिकारी या वरील अधिकारी यांच्याशी चर्चा करून १००% अडचण दूर केली जाणार.प्रत्येक तालुक्यातील तालुकाध्यक्ष व तालुका टीमच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबविण्यात आले आहे.ह्या अभियानाची सुरूवात अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातून सुरूवात करण्यात आली आहे.
ही सुरुवात पुर्ण महाराष्ट्र राज्यात करण्याचे काम त्रिदल सैनिक सेवा संघाच्या माध्यमातून करण्याचे काम चालु आहे.येत्या सहा महिन्यात सैनिक व सैनिक परिवाराची एकही अडचण राहणार नाही.महाराष्ट्र राज्यातील शहिद वीर पत्नी,शहिद वीर माता-पिता,अपंग सैनिक,सेवारत सैनिक,माजी सैनिक व सैनिक व सैनिक परिवाराने आपल्या गावात आपल्या पुढारकाराने आपल्या गावात त्रिदल सैनिक सेवा संघाची शाखा काढण्याचा १००% प्रयत्न करावा आपला प्रयत्न १००% यशस्वी होणारच असे मत त्रिदल सैनिक सेवा संघ महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष मा.संदीप लगड यांनी व्यक्त केले आहे.या अभियानाची सुरूवात करताना महाराष्ट्र राज्यातील त्रिदल सैनिक सेवा संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.त्रिदल सैनिक सेवा संघ महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष मा.संदीप लगड,त्रिदल सैनिक सेवा संघ महाराष्ट्र राज्याचे कोषाध्यक्ष मा.अंकुशजी खोटे,त्रिदल सैनिक सेवा संघ उत्तर महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष मा.नवनाथ मोहिते,त्रिदल सैनिक सेवा संघ महाराष्ट्र राज्याचे कोरकमिटीचे कार्याध्यक्ष मा.जे.के.कटके,त्रिदल सैनिक सेवा संघाचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष मा.भाऊसाहेब रानमाळ,त्रिदल सैनिक सेवा संघाचे पारनेर तालुकाध्यक्ष मा.लामखडे अण्णा,त्रिदल सैनिक सेवा संघाचे नगर तालुकाध्यक्ष मा.शरदजी पवार,त्रिदल सैनिक सेवा संघाचे शिरूर तालुकाध्यक्ष मा.बबनराव पवार,त्रिदल सैनिक सेवा संघाचे दौंड तालुकाध्यक्ष मा.आबासाहेब चोरमले,त्रिदल सैनिक सेवा संघाचे शिरूर तालुका सचिव मा.भाऊसाहेब जाधव,त्रिदल सैनिक सेवा संघाचे दौंड तालुका सचिव मा.शरद शितोळे,त्रिदल सैनिक सेवा संघाचे शिरूर टीमचे जेष्ठ मार्गदर्शक व गुरूवर्य मा.घावटे सर,त्रिदल सैनिक सेवा संघाचे शिरूर टीमचे जेष्ठ मार्गदर्शक व गुरूवर्य मा.बबनराव फलके,त्रिदल सैनिक सेवा संघाचे नगर तालुका टीमचे जेष्ठ मार्गदर्शक व गुरूवर्य मा.रवि राऊत व त्रिदल सैनिक सेवा संघाची टीम.उपस्थित होती.
त्रिदल सैनिक सेवा संघामध्ये महाराष्ट्र राज्यातील पदाधिका-यांचा मोठा बदल करण्यात आला आहे.महाराष्ट्र राज्यातील सैनिक व सैनिक परिवाराला जाहिर आव्हान करण्यात येते की,सैनिक व सैनिक परिवाराच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी व प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्रिदल सैनिक सेवा संघाचे पदाधिकारी एक ही रूपया घेणार नाहीत.त्रिदल सैनिक सेवा संघाचा पदाधिकारी आहे म्हणून जर आपण कोणाला पैसे दिले तर त्याला त्रिदल सैनिक सेवा संघ महाराष्ट्र राज्याचे पदाधिकारी जबाबदार राहणार नाही.पैसे देणा-या सैनिक व सैनिक परिवाराचा एक शब्द ही ऐकला जाणार नाही याची नोंद महाराष्ट्र राज्यातील सैनिक व सैनिक परिवाराने घ्यावी.त्रिदल सैनिक सेवा संघाच्या नावाखाली कोण पैसे मागत असेल तर आपण त्रिदल सैनिक सेवा संघ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष मा.संदीप(भाऊ)लगड यांच्याशी संपर्क करावा संपर्क ८९८१७७७१७१/९४०३१७७७११/६३९११७७१७१/६३८९१७७१७१ या नंबरवर संपर्क करावा.महाराष्ट्र राज्यातील सैनिक व सैनिक परिवाराची दिशाभुल करण्यासाठी राजकीय दोन टक्के माजी सैनिक राजकीय पक्षाचे नाव जोडून सैनिकांची संघटना काढत आहेत.त्यांच्यापसून सैनिक व सैनिक परिवाराने सावधान राहिले पाहिजे.
त्रिदल सैनिक सेवा संघामध्ये पॅरामिलेर्टी,आर्मी,नेव्ही,एअरफोर्स या सर्व आजी-माजी सैनिकांनी सामील व्हावे असे जाहिर आव्हान त्रिदल सैनिक सेवा संघाच्या माध्यमातून करण्यात आले आहे.महाराष्ट्र राज्यात जवानांची एकमेव संघटना म्हटले की,त्रिदल सैनिक सेवा संघ ह्या संघटनेचे नाव पुढे येते.त्रिदल सैनिक सेवा संघ ही संघटना पुर्ण महाराष्ट्र राज्यातील छत्तीस जिल्ह्यात कार्यरत आहे.महाराष्ट्र राज्यातील सैनिक व सैनिक परिवाराने त्रिदल सैनिक सेवा संघामध्ये आपल्याच न्याय व हक्कासाठी एकत्र येण्याची गरज आहे.
0 टिप्पण्या