नातेपुते नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांच्या अनागोंदी कारभारा विरोधात दलित महासंघाचे नगरपरिषद प्रशासन विभाग जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर यांना निवेदन........
नातेपुते नगरपंचायत नातेपुते सार्वत्रिक निवडणुक खर्चाची संपूर्ण दप्तर चौकशी करून संबंधित अधिकारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची निवेदनात मागणी
प्रतिनिधी/सोलापूर
नातेपूते नगरपंचायतीची निवडणूक 2021 हि निवडणूक प्रक्रिया दोन टप्यात पार पाडली . यामध्ये नातेपूते नगरपंचायत नातेपूते सार्वत्रिक निवडणुक २०२१ खर्चाचा तपशिल मध्ये मोठया प्रमाणात तृटी आढळून येत आहेत . निवडणूक कर्मचारी भत्ता , वाहन , जेवन नाष्टा मंडप , डिजीटल फोटो स्टुडिओ , व्हिडिओ शुटिंग , महसुल कर्मचारी भत्ता व इतर खर्चामध्ये संबंधित अधिकारी यांच्या संगणमताने मोठया प्रमाणात अपहार ( भ्रष्टाचार ) झाल्याचे दिसुन येत आहे. टेंडर प्रक्रियेत तृटी आढळून येत आहेत अशा आशयाचे निवेदन दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष मा. प्रा.डाॅ.मच्छिंद्रजी सकटे सर यांच्या मार्गदर्शनाखाली पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस सचिन रणदिवे यांनी नगरपरिषद प्रशासन विभाग जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर यांना दिले आहे. संपूर्ण निवडणुक कार्यकाळातील झालेला एकुण खर्च २२,३८,०५ ९ / - या खर्चाची संपूर्ण दप्तर चौकशी करण्यात यावी.तसेच नातेपुते नगरपंचायतचे संबंधित अधिकारी यांचा अनागोंदी कारभार सुरू असल्याचे दिसून येत आहे तरी आपण आपल्या स्तरावरून नातेपूते नगरपंचायतीची निवडणूक कार्यकाळातील संपुर्ण दप्तर चौकशी तात्काळ करून संबंधित अधिकारी यांच्यावर योग्य ती कायदेशीर कार्यवाही करावी अन्यथा दलित महासंघाच्या वतीने सोलापुर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र स्वरूपात अंदोलन करण्यात येईल यांची नोंद घ्यावी हि विनंती अशा आशयाचे निवेदन देण्यात आले आहे. सदर निवेदनाची माहितीसाठी पत्र १ ) मा . मुख्यमंत्री सो महाराष्ट्र राज्य , मुंबई . २ ) मा . राज्य निवडणुक आयोग महाराष्ट्र , मुंबई . ३ ) मा . जिल्हा अधिकारी सो सोलापूर यांना देखील ई-मेल द्वारे देण्यात आल्या आहेत.
0 टिप्पण्या