स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कामगिरी ; वालचंदनगर पोलीस स्टेशन हद्दीत घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणून आरोपीस केले जेरबंद ......!

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कामगिरी ; वालचंदनगर पोलीस स्टेशन हद्दीत घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणून आरोपीस केले जेरबंद ......! 
 वालचंदनगर पोलीस स्टेशन हद्दीतील घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणून आरोपीला अटक करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले आहे . गणेश उर्फ भैय्या लक्ष्मण लांडगे ( वय २५ रा . अंथुर्णे ता . इंदापूर ) असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे . 
अशोक शेळके यांनी संबंधित गुन्ह्याचा तपास करण्यासाठी तपास पथकास वालचंदनगर पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेऊन त्यांना तात्काळ अटक करा असे आदेश दिले.  तपास पथकाने संबंधित गुन्ह्याच्या चौकशीसाठी आरोपी गणेश उर्फ भैय्या लांडगे याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता . आरोपी लांडगे याने गुन्ह्याची कबुली दिली . त्यांनतर आरोपी लांडगे याची वैद्यकीय तपासणी करून पुढील कारवाईसाठी वालचंदनगर  पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे . भा.द.वी. क 457,380 प्रमाणे वालचंदनगर पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक, डॉ. अभिनव देशमुख. अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधीकारी श्री. गणेश इंगळे यांच्या मागदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. अशोक शेळके पो.स.ई.श्री.अमित सिदपाटील, सहा.फौज बाळासाहेब कारंडे, सहा.फौज रविराज कोकरे, पो.हवा. अभिजीत एकशिंगे, पो.हवा. स्वप्निल अहिवळे यांनी केली.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या