१ लाख रुपयांची लाचेची मागणी करणारे जुन्नर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकासह वकिल ACB च्या जाळ्यात....!
जुन्नर : गुन्ह्यातील फायनल सेटलमेंट करण्यासाठी १ लाख रुपयांची लाचेची मागणी करणाऱ्या जुन्नर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकासह वकिल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात शनिवारी (ता.१) सापडला आहे.अमोल साहेबराव पाटील (वय ३२. पोलीस उपनिरीक्षक, नेमणूक जुन्नर पोलीस ठाणे) आणि केतन अशोक पडवळ (व्यवसाय वकील) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहे. याप्रकरणी एकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्यावर जुन्नर पोलीस ठाण्यातील दाखल असलेल्या गुन्ह्यांची फायनल सेटलमेंट करून मदत करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक अमोल पाटील व वकील केतन पडवळ यांनी १ लाख रुपयांची लाच मागणी केली. याप्रकरणी तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.सदर तक्रारीची पडताळणी केली असता, तक्रारदारयांच्याकडे १ लाख रुपयांची लाच मागणी केली व लाच स्वीकारण्याचा प्रयत्न केला म्हणून वरीलप्रमाणे लाच मागणीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.त्यानुसार आरोपी पाटील व पडवळ यांना अटक करून खेड येथील विशेष न्यायालयात रविवारी (ता.२) हजर केले असता न्यायालयाने मंगळवार (ता.४) पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केली आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री. राजेश बनसोडे, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली आहे.पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षक ज्योती पाटील करीत आहेत.
0 टिप्पण्या