आय लव यू मेसेज चे प्रकरण उघडकीस येताच बारामती विभागातील पोलीस अधिकारी १५ दिवसांच्या रजेवर..! काय आहे प्रकार वाचा पुढे...
बारामती
समाजाच्या सुरक्षेची जबाबदारी पोलीस प्रशासनावर आहे. मात्र, १०० चांगली कामे करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कामावर पाणी फेरण्याचे काम अशा अधिकाऱ्यांकडून होताना दिसत आहे.बारामती परिसरातील एका पोलीस अधिकाऱ्यानेच स्वत: एका महिलेला अश्लिल संदेश पाठवल्याचे कृत्य समोर आले आहे. त्यामुळे अशा अधिकार्यांमुळे पोलिसांच्या प्रतिमेला कलंक लावण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणाविषयी पोलिसांकडे कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. परंतु , त्याबाबत कुणकूण लागताच संबंधित अधिकारी पंधरा दिवसांच्या रजेवर गेलेले असल्याची माहिती पुढे आली आहे.
एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने महिलेला तिच्या व्हॉटसऍपवर अश्लिल मेसेज पाठवल्याची सोशल मीडियावर चर्चा रंगली असताना याची वरिष्ठांनी गांभीर्याने दखल घेत प्रकरणाची तातडीने चौकशी सुरु केली आहे. बारामती विभागात एका पोलीस ठाण्याचा हा वरिष्ठ पोलिस अधिकारी प्रमुख आहे. त्याने एका महिलेला तिच्या व्हॉटसऍपवर अश्लील मेसेज ‘आय लव्ह यु’ पाठवला , त्याचा स्क्रीनशॉट काही जणांकडे असल्याची माहिती समोर येत आहे. मागील वर्षी याच काळात बारामतीतच एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचे एका मुलीसोबतचे फोटो व क्लिप व्हायरल झाल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला होता. त्यानंतर बारामतीतून संबंधित पोलिस अधिकाऱ्याची तातडीने तडकाफडकी बदली केली गेली. याची विधानसभेपर्यंत चर्चा झाली होती, मात्र थेट तक्रार नसल्याने संबंधित अधिकाऱ्याचे केवळ बदलीवरच निभावले.या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून बारामतीत पुन्हा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची चर्चा रंगली असुन या अधिकाऱ्याचे हे मेसेज सर्वत्र चर्चेचा विषय ठरले आहेत. पोलिसांनी उपलब्ध माहितीच्या आधारे चौकशी सुरु केल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने नमूद केले.या अधिकाऱ्यांनी संबंधित महिलेला या पोलिस अधिकाऱ्याने काही अश्लिल इमोजीही पाठवलेले आहेत. ‘आय लव्ह यू’ तसेच तुझा होकार आहे की नाही ते एकदाच सांग शेवटच विचारतोय, अशी देखील थेट विचारणा केल्याचे या मेसेजमध्ये पाठविल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे हे सर्व मेसेजरात्री अकरा नंतर केले गेले आहेत. संदेशातील वेळेवरुन दिसुन येते.
0 टिप्पण्या