आईसह तीन मुलींचा तलावात बुडून मृत्यू ; धक्कादायक घटना…!

 आईसह तीन मुलींचा तलावात बुडून  मृत्यू ; धक्कादायक घटना…!

जत 
बिळुर (ता. जत) येथील तलावात पडून आई आणि तीन मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रविवारी (ता. ९) घडली आहे. या घटनेमुळे सांगली जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून नागरिकांकडून हळहळ व्यक्त होत आहे.सुनीता माळी (वय ३०), अमृता माळी (वय १३), अश्विनी माळी (वय १०), ऐश्वर्या माळी (वय ७) अशी मृत्यू झालेल्या आई मुलींची नावे आहेत.

मिळालेल्या माहिती नुसार, सुनीता माळी ह्या कपडे धुण्यासाठी मुलींसह गावाजवळील तलाव परिसरात गेल्या होत्या. रविवारी (ता. ९) रात्री या चौघींचेही मृतदेह तलावाच्या पाण्यात आढळून आले. गावकऱ्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.दरम्यान, रात्री उशिरा तलावातून आईसह तीन मुलींचे मृतदेह पाण्याच्या बाहेर काढण्यात आले. तसेच या तलावातून धुण्याचे कपडे आणि साबण असे साहित्य आढळून आले आहे. या घटनेचा पुढील तपास जत पोलीस करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या