माळशिरस प्रतिनिधी... धनंजय थोरात
जेईई/नीट/एमएचटी-सीईटी या परिक्षांच्या ऑनलाईन प्रशिक्षणासाठी मागासवर्गीय, विमुक्त जाती भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना महात्मा ज्योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) नागपूर या संस्थेच्या वतीने सोलापूर येथे
श्रीमती छाया गाडेकर (उपायुक्त जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती सोलापूर),
माननीय श्री कैलास आढे (सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सोलापूर),
श्री सचिन कवले (संशोधन अधिकारी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती सोलापूर),
श्रीमती सुलोचना सोनवणे (विशेष अधिकारी शासकीय निवास शाळा)
श्री भरत कुमार मोरे (वरिष्ठ पत्रकार दैनिक पुण्यनगरी)
यांच्या हस्ते मोफत टॅबचे वितरीत करण्यात आले.
यावेळी खुडूस येथील यशराज तुकाराम ठवरे, सुजीत चौगुले ,बाळराजे ठवरे, प्रतिक म्हसवडे या विद्यार्थांची निवड झाली.
सदर विद्यार्थांचे सर्व स्तरातून कौतूक केले जात आहे.
0 टिप्पण्या