मोर्चाचा आयोजक तक्रारदार कार्यकर्ता तुपाशी,,इतर मात्र उपाशी,,,
मोर्चाच्या आयोजकाची सध्या लाखोंची उलाढाल होत आहे,ती कोटीमध्ये वाढ करण्यासाठी मोर्चात सामील व्हायचं का ?
प्रतिनिधी : माळशिरस : उत्तमराव जानकर यांच्या जातीच्या दाखल्याच्या संदर्भात चौकशी करण्यात यावी याचे तक्रारी अर्ज विविध कार्यालयात भाजप च्या मोहिते पाटील यांचा कार्यकर्ता असलेल्या कार्यकर्त्याने दिलेले आहेत. त्याचे बक्षीस म्हणून भाजपमधील मोहिते पाटील यांच्या फंडातून आलेल्या कामांपैकी लाखो रुपयांची कामे देवून त्यांचा बक्षीस रुपी गौरव केला आहे.
भाजपमधील मोहिते पाटील यांनी लाखो रुपयांची कामे दिल्याने तक्रादार कार्यकर्त्यांने अकलूज मध्ये १६ फेब्रुवारी रोजी मोर्चाचे आयोजन केले आहे,सध्या तक्रादार कार्यकर्त्यांला लाखो रुपयांची कामे दिल्यामुळे स्वतःच्या मालकाला व नेत्याला खुश करण्यासाठी लाखो रुपयांमधील थोडेफार पैसे खर्च करून भाजपमधील मोहिते पाटील यांचे पारंपरिक विरोधक असलेले उत्तमराव जानकर यांच्या जातीच्या दाखला प्रकरणाची चौकशी करण्यात यावी यासाठी मोर्चा आयोजित केला आहे.कामातून मिळणारा थोडा पैसा खर्च केल्यास भाजपमधील मोहिते पाटील खुश होतील असा अंदाज तक्रारदार कार्यकर्त्याने लावला आहे.
तक्रादार कार्यकर्त्याने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी उत्तमराव जानकर यांच्या जातीच्या दाखल्याचे प्रकरण काढून त्याची चौकशी करण्यासाठी मोर्चा आयोजित केला आहे.मोर्चामध्ये सामील होणाऱ्या सर्वसामान्य जनतेला भाजपमधील मोहिते पाटील किती लाखांची कामे देणार ? हा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे.मोर्चात सामील होत असताना ज्यांनी लाखो रुपयांची कामे घेऊन स्वतःचे घर कुटुंब उभा करण्याचा प्रयत्न केला आहे, त्या मोर्चाच्या आयोजक असलेला तक्रारदार कार्यकर्ता मोर्चामध्ये सामील होणाऱ्या लोकांना किती रुपये देणार आहे ? हा चर्चेचा विषय बनला आहे.उत्तमराव जानकर यांच्या विरोधामध्ये तक्रारी केल्यामुळेच तक्रारदार कार्यकर्त्याला भाजपमध्ये असलेल्या मोहिते पाटील यांनी लाखो रुपयांची कामे दिली असल्याची चर्चा संपूर्ण अकलूज परिसरामध्ये चालू आहे. मोर्चा आयोजित करून स्वतःच्या मालकाला खुश करून या लाखो रुपयांचे रूपांतर कोट्यावधी रुपयांच्या कामांमध्ये व्हावे हाच उद्देश तक्रारदार कार्यकर्त्याने मनामध्ये ठेवला असल्याची चर्चा संपूर्ण अकलूज परिसरामध्ये चालू आहे. हा उद्देश साध्य करण्यासाठी उत्तमराव जानकर यांच्या जातीच्या दाखल्याचे प्रकरण बाहेर काढून सर्व सामान्य आंबेडकरी जनतेला व मागासवर्गीय जनतेला वेड्यात काढून स्वतःचा धंदा जोमात चालवण्यासाठी आणि स्वतःचे आर्थिक भांडवल वाढवून भाजपमधील मोहिते पाटील यांच्या मनामध्ये जागा निर्माण करण्यासाठी आणि कोट्यावधी रुपये कमवण्यासाठीच हा धंदा मांडला आहे.येणाऱ्या नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये एक कट्टर कार्यकर्ता आणि एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून भाजपमधील मोहिते पाटील यांच्याकडून उमेदवारी मिळावी या अपेक्षाने चाललेला हा खटाटोप आहे.हे संपूर्ण प्रकरण अकलूजमधील सर्व सामान्य जनतेच्या लक्षामध्ये आले असून संपूर्ण मोर्चा हा भाजपमधील मोहिते पाटील यांनी आखला असल्याचे स्पष्ट झाले आहे,मोर्चाचे आयोजक तक्रारदार कार्यकर्त्याने स्वतःचा लाखो रुपयांचा फायदा करून घेतला आहे,मात्र मोर्चात सामील होणाऱ्या इतरांचा भाजपमधील मोहिते पाटील किती लाखो रुपयांचा फायदा करतील ? हा येणारा काळच ठरवेल,त्यामुळे इतरांच्या संपत्तीत वाढ करण्यासाठी आंबेडकरी चळवळीतील मातंग,महार होलार व इतर अनुसूचित जाती जमाती मधील लोकांनी मोर्चात सामील व्हायचं का नाही याचा विचार करणे फार गरजेचे बनले आहे.
0 टिप्पण्या